घरमुंबईभाऊबीजेदिवशी रेल्वेप्रवास ठरला डोकेदुखी

भाऊबीजेदिवशी रेल्वेप्रवास ठरला डोकेदुखी

Subscribe

मालगडीला आग लागल्याने १७ एक्स्प्रेस रद्द

ऐन दिवाळीच्या सुट्टीमध्ये पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या चांगलाच खोळंबा झाला. कारण भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील डहाणू-वाणगाव हद्दीत मालगाडीच्या दोन डब्यांना भीषण आग लागली. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. या घटनेचा परिणाम दुसर्‍या दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशीही दिसून आला. कारण पश्चिम रेल्वेने एकूण १७ गाड्या लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले. या सर्व प्रकरणाची पश्चिम रेल्वेकडून विभागीय चौकशी होणार आहे.

गुरुवारी, ८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास डहाणू-वाणगाव या स्थानकादरम्यान मालगाडीच्या दोन डब्यांना भीषण आग लागली होती. सुरतहून जेएनपीटीकडे जात असताना ही घटना घडली. दरम्यान, या घटनेमुळे गुजरात-मुंबईदरम्यानची वाहतूकदेखील विस्कळीत झाली. त्यामुळे लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. शिवाय, गुजरातहून मुंबईकडे येणार्‍या एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या असून मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणार्‍या गाड्यांची वाहतूक धीम्यागतीने सुरू होती.

- Advertisement -

ओव्हरहेड वायर तुटून ती तेलाचे कंटेनर घेऊन जाणार्‍या मालगाडीवर पडली. त्यामुळे डब्यांना आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डब्यात प्लास्टिकचे ग्रेनील असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, ओव्हरहेड वायर आणि रुळाचे नुकसान झाले. यामुळे डहाणू-विरार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याचा फटका विशेषत: लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला. गुजरातहून मुंबईकडे येणार्‍या एक्स्प्रेस गाड्या अजूनही खोळंबल्या आहेत. तर मुंबईहून गुजरातकडे जाणार्‍या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक संथगतीने सुरू होती. विरार- डहाणू या मार्गावरील उपनगरीय गाड्यांची सेवाही बंद असल्याने भाऊबीजेसाठी निघालेल्या नागरिकांचाही खोळंबा झाला आहे.

सहा ते सात तास ट्रेन खोळंबल्या

गुरुवारी रात्री मालगाडीच्या दोन डब्यांना भीषण आग लागण्याच्या घटनेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला. गुजरातहून मुंबईकडे येणार्‍या एक्स्प्रेस गाड्या अजूनही खोळंबल्या आहेत. तर मुंबईहून गुजरातकडे जाणार्‍या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यामुळे प्रवाशी रेल्वे डब्यात अडकून पडले होते. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांवर कर्णावती एक्स्प्रेस, डबल डेक्कर, जयपूर एक्स्प्रेस, स्वराज एक्स्प्रेस, अवंतिका एक्स्प्रेस या गाड्या आपल्या निश्चित वेळे पेक्षा सहा ते सात तास उशिरा पोहचल्या. त्यामुळे प्रवाशाचे मोठे हाल झाले.

या गाड्या रद्द मुंबईकडे जाणार्‍या 

- Advertisement -

५९४४२ – अहमदाबाद पॅसेंजर
६९१७४ – डहाणू – अंधेरी मेमु शटल
५९०२४ – वलसाड पॅसेंजर
५९०३८ – सुरत विरार शटल
६९१६४ – डहाणू- पनवेल मेमु
६१००१ – बोईसर दिवा मेमु
======================
डहाणूकडे जाणार्‍या
५९४४१- अहमदाबाद पॅसेंजर
६९१७३ – विरार डहाणू मेमु
५९०२३ – वलसाड पॅसेंजर
====================

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -