घरमुंबईभिडे गुरुजी घाबरले अटक टाळण्यासाठी वकिलांची पळापळ

भिडे गुरुजी घाबरले अटक टाळण्यासाठी वकिलांची पळापळ

Subscribe

प्रतिनिधी पीसीपीएनडीटी कायद्याच्या उल्लंघनप्रकरणीच्या सुनावणीला संभाजी भिडे सलग पाचवेळा उपस्थित न राहिल्याने न्यायालयाकडून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात येणार होते. त्यामुळे अटक टाळण्यासाठी घाबरलेल्या भिडेंच्या वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात धाव घेत पुढील सुनावणीला भिडे उपस्थित राहणार असल्याचे लेखी देत शरणागती पत्करली. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भिडेंविरोधात नाशिक न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला सलग पाच वेळा ते गैरहजर राहिले होते. प्रत्येक सुनावणीनंतर भिडेंना न्यायालयात उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीसही पाठवण्यात येत असे. नोटीस घेण्यास भिडे यांच्याकडून नकार देण्यात येत असल्याचा अहवाल न्यायालयाकडे सादर करण्यात आला होता. अहवालाची दखल घेऊन भिंडेविरोधात अटक वॉरंट काढण्याची शक्यता असल्याने निर्माण झाल्याने न्यायव्यवस्था न मानणार्‍या भिडेंच्या वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात धाव घेतली. यावेळी भिडे पुढील सुनावणीला हजर राहतील, त्यामुळे अटक वॉरंट काढण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांच्या वकीलांनी न्यायालयात केली. भिडेच्या उपस्थितीबाबत वकिलांनी लेखी दिल्यानंतरच न्यायालयाने पुढील सुनावणीला भिडे हजर न राहिल्यास त्याच्यांविरोधात अटक वॉरंट काढण्यात येईल, असे आदेश दिले.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी नाशिक येथे जूनमध्ये झालेल्या सभेत ‘माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने 150 जणांना मुले झाली. तसेच ज्यांना पुत्र हवा होता त्यांना पुत्रच झाला’, असे वादग्रस्त विधान केले होते. पीसीपीएनडीटी कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी समाजसेवक गणेश बोर्‍हाडे यांनी भिडेंविरोधात कारवाई करण्यासाठी नाशिक महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भिडेंविरोधात नाशिक दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -