घरमुंबईmahaparinirvan din : दादर स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर करा, भीम आर्मीचं...

mahaparinirvan din : दादर स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर करा, भीम आर्मीचं दादर स्थानकाबाहेर आंदोलन

Subscribe

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज हजारोंच्या संख्येने अनुयायी दादार चैत्यभूमीवर दाखल झाले आहे. अशातच भीम आर्मी संघटनेने दादर स्थानक परिसरात आंदोलन सुरु केले आहे. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी करत दादर स्टेशन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे दादर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महापरिनिर्वाण दिनी देशासह राज्यभरातील अनुयायी दादर चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात. यावेळी बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर जाण्यासाठी अनुयायी दादर स्थानाकावरचं उतरतात. त्यामुळे दादर स्थानकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यापूर्वी देखील अनेकदा ही मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

जय भीम, जय भीम, नामांतरण झालेच पाहिजे झालेच पाहिजे, होत कसं नाही झालेच पाहिजे अशा घोषणाबाजी करत भीम आर्मीचे शेकडो कार्यकर्ते दादर स्थानकात शिरले. या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दादर स्टेशन परिसरात मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान सुरुवातीला पोलिसांनी या आंदोलन कर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी आंदोलन कर्त्यांना दादर स्थानकावरील ब्रिजवरून घोषणाबाजी करत चालत जाण्यास सांगितले. यावेळी काही कार्यकर्त्यांना दादर स्थानकाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर करणाऱ्या मागणीचे पोस्टर झळवकले, तसेच नामांतरण लवकरात लवकर करण्याची मागणी केली. या पोलीस बळाच्या मदतीने आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


माझ्यासोबत नमाज पढायला नियमित यायचे, चैत्यभूमीवरील विरोधानंतर मलिकांचा वानखेडेंवर निशाणा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -