Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरण: वरवरा राव यांना अंतरिम जामीन मंजूर

भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरण: वरवरा राव यांना अंतरिम जामीन मंजूर

वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी या मागणीसाठी राव यांच्यासह त्यांच्या पत्नी यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली होती

Related Story

- Advertisement -

शहरी नक्षलवाद आरोपाप्रकरणी अटकेत असलेले ८२ वर्षांचे लेखक-कवी वरवरा राव यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा आज निर्णय झाला. यावेळी वरवरा राव यांच्या जामीनावर सुटका झाली. तर वरवरा राव यांचा जामीन मंजूर करण्यात आले आहे. लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी या मागणीसाठी राव यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका केली होती.

प्रदिर्घ काळ सुरू असलेल्या वरवरा राव यांच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर कऱण्यात आला. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय जाहीर केला नव्हता. तसेच निर्णय होईपर्यंत राव यांना नानावटी रुग्णालयातच ठेवण्याचे आदेश स्पष्ट केले होते. तर यासंदर्भात उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, राव यांचे वय, आरोग्य आणि कैद्याचा वैद्यकीय सुविधा मिळण्याचा मूलभूत अधिकार लक्षात घेता आम्ही त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करत आहोत.

- Advertisement -

राव यांनी गेल्या ३६५ दिवसांपैकी १४९ दिवस विविध रुग्णालयात होते. त्यातूनच त्यांची वैद्यकीय स्थिती लक्षात येते, असा युक्तिवाद राव यांच्या कुटुंबियांतर्फे सुनावणीच्या वेळी करण्यात आला होता. यासह राव यांची प्रकृती ही कारागृहात नाही, तर कुटुंबात राहून सुधारेल, असा दावा करत तळोजा कारागृहाऐवजी हैदराबाद येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राव यांच्या कु टुंबियांतर्फे करण्यात आली. तर राव यांची वैद्यकीय स्थिती माहीत असूनही त्यांना अटकेत ठेवणे म्हणजे त्यांच्या जगण्याच्या आणि चांगल्या आरोग्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, असा दावाही करण्यात आला.

जाणून घ्या, भीमा कोरेगाव प्रकरण?

मराठा सेना आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या २०० व्या स्मृतिदिनानिमित्त ३१ डिसेंबर २०१७ रोजी`भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान’ या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते.
३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या ‘एल्गार परिषदे’तील वक्तव्यं कारणीभूत होती अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला.

- Advertisement -

या ‘एल्गार परिषदे’मागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत, या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली. २८ ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालविस यांना अटक केली.

कोण आहे वरवरा राव?

वरवरा राव हे ७८ वर्षांचे असून गेल्या चाळीस वर्षापासून ते तेलंगणा, आंध्र प्रदेशसह बस्तर भागात क्रांतीकारी कवी लेखक म्हणून परिचित आहेत. मुळचे तेलंगणाच्या वारंगल जिल्हयात ३ नोव्हेबर १९४० साली जन्मलेले वरवरा राव यांनी १९५७ पासून विद्रोही कविता करायला सुरुवात केली. माओवादी चळवळीसह विचारधारेचा पुरस्कार करणाऱ्या राव यांनी विविध वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये लिखाण केले आहे. राव यांनी १९६६ मध्ये सृजना नावाचे मासिकही सुरू केले होते. वरवरा राव यांनी विप्लव रचयिता संघम नावाची विद्रोही कवींची एक संघटना स्थापन केली असून त्या संघटनेच्या माध्यमातून तेलुगू भाषेत अनेक कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. घरात अत्यंत साध्या पद्धतीने ते राहतात. त्यांना दोन मुली असून दोघींचे लग्न झाले आहे. तत्कालीन ‘पीपल्स वॉर ग्रुप’ या माओवादी संघटना आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्यात २००४ मध्ये झालेल्या चर्चेत वरवरा राव यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

- Advertisement -