घरमुंबईBhiwandi Building Collapse : इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १८; बचावकार्य सुरू

Bhiwandi Building Collapse : इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १८; बचावकार्य सुरू

Subscribe

भिवंडीतील पटेल कम्पाऊंड परिसरात रविवारी मध्यरात्री तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली असून आज, मंगळवारी सकाळपर्यंत येथील मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. याबाबतची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमचे बचावकार्य सुरू असून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ढिगाऱ्याखालून चार व्यक्तींचा मृतदेह काढण्यात आला आहे. तसेच तीन जखमी व्यक्ती या ठिकाणी आढळून आले आहेत.

मृतांची नावे –

  1. नजमा मुरादल्ली (महिला) – वय ५५
  2. अफसाना अक्रम अन्सारी (महिला) – वय ११
  3. अमन शेख (पुरुष) – वय २८
  4. सईद अब्दुल खान (पुरुष) – वय २३

जखमींची नावे –

  1. खालिद खान (पुरुष) – वय ४०
  2. शबाना शेख (महिला) – वय ५०
  3. जरीना अन्सारी (महिला) – वय ४५

- Advertisement -

या दुर्घटनेप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात या बिल्डिंगचे मालक सय्यद अहमद जीलानी याच्याविरुद्ध भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अधिकारी यांच्या तक्रारीवरून भा. द. वि. कलम ३३७, ३३८. ३०४ (२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा –

अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल; सुनावणीकडे सर्वाचे लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -