घरमुंबईपक्षाने दिलेल्या उमेदवारालाच पाठिंबा भिवंडी कॉंग्रेसचा नर्धार

पक्षाने दिलेल्या उमेदवारालाच पाठिंबा भिवंडी कॉंग्रेसचा नर्धार

Subscribe

अल्पसंख्यांक विभागाचे कोकण प्रांत अध्यक्ष अनिस कुरेशी यांची भिवंडीतील पत्रकार परिषदेत या संदर्भात भूमिका मांडली आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस आयात उमेदवाराला लोकसभेचे तिकीट देणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आयात उमेदवारास तिकीट दिल्यास आम्ही आयात उमेदवाराचे काम करणार नाही, असा पवित्रा काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला होता. तशी जाहीर प्रतिक्रिया काँग्रेसच्या ग्रामीण कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. शहरातील बारादारी हॉटेल येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी त्यासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले. मात्र या पत्रकार परिषदेत आयात उमेदवार कोण असणार ? अशी विचारणा पत्रकारांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केली असता अधिकृत उत्तर कुणीही दिले नाही. त्यामुळे या पत्रकार परिषदेत खूप गोंधळ निर्माण झाला होता.

पक्ष श्रेष्ठींचा निर्णय मान्य

दरम्यान, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे कोकण प्रांत अध्यक्ष अनिस कुरेशी यांनी सहभाग घेत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील आणि जो उमेदवार देतील त्याचे काम सर्व काँग्रेस कार्यकर्ते तन मनाने करणार अशी ग्वाही दिल्याने विरोधी भूमिका घेणारे काँग्रेस कार्यकर्त्यांचा सूर मावळला. त्यामुळे आता काँग्रेसच्या आयात उमेदवाराला विरोध होणार नाही अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. मात्र हा आयात उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -