Eco friendly bappa Competition
घर मुंबई Bhosari Land Misappropriation : खडसेंच्या जावयाला उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

Bhosari Land Misappropriation : खडसेंच्या जावयाला उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

Subscribe

मुंबई : भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळून लावली आहे. यावेळी न्यायालयाने खडसे यांनी महसुलमंत्री असताना आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याची टीप्पणी केली आहे.

उच्च न्यायालयाने म्हटले की, भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी सादर पुराव्यांचा विचार करता माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकथान खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केल्याचे निरर्शनास येते.

- Advertisement -

न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी म्हटले की, एकनाथ खडसे यांना महसूल मंत्री या नात्याने सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याचे किंवा निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होते. परंतु, त्यांनी अधिकारांचा दुरुपयोग करताना स्वत:साठी आणि कुटुंबासाठी आर्थिक फायदा मिळवण्यासाठी केला, असे निरीक्षण नोंदवताना खडसे यांचे गिरीश चौधरी यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

गिरीश चौधरी यांनी सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यास ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिक सिंग यांनी विरोध केला होता. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने ईडीची बाजू ग्राह्य धरून मनी लाँड्रिंगप्रकरणात चौधरी यांनी महत्त्वपूर्व भूमिका बजावली होती आणि त्यांचा सहभाग दर्शवणारे पुरावे असल्याचे निरीश्रण चौधरी यांचा अर्ज फेटाळताना नोंदवले होते.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी बंड गार्डन पोलीस स्टेसनमध्ये तक्रार दाखल केली होती. गावंडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत सक्तवसुली संचालनालयाने (ED) गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. भोसरी परिसरातील सर्व्हे क्र. 52/2 अ ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीची ४० कोटी रुपयांची जमीन खडसे यांनी महसूल मंत्री असताना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहारात रितसर नोंद आहे. खडसे यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत पत्नी मंदाकिनी आणि सुनेच्या नावे ३.७५ कोटी रुपये किंमतीने खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आरोप आहे. सक्तवसुली संचालनालयाने गिरीश चौधरी यांना 6 जुलै 2021 रोजी अटक केली होती.

- Advertisment -