घरमुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन ३१ मार्चला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन ३१ मार्चला

Subscribe

मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा करण्यात येणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन येत्या ३१ मार्चला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. राज्यात सध्याच्या कोरोना प्रतिबंधक नियमावलीमुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा भूमिपूजन सोहळा ३१ मार्च सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. सध्या राज्यात कोरोना संसर्ग वाढलेला असल्यामुळे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने विशेष परवानगी घेतली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या कार्यकाळात मंजुरीला चालना मिळाली होती. त्यानंतर आताच्या ठाकरे सरकारमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे या स्मारकाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी अर्थसंकल्पात ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यानंतर तातडीने स्मारकाचे काम हाती घेण्यात येत आहे. बुधवार ३१ मार्चला या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे. स्मारकाचे काम हे दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाहेरील सजावट करण्यात येणार आहे. तसेच वाहनतळ आणि बाग तयार करण्यात येणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे देखील काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/ गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी शो अशा तांत्रिक गोष्टींवर काम करण्यात येणर आहे. यासाठी अंदाजे १५० कोटी खर्चाचा अंदाज आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -