घरमुंबईसायकलप्रेमी चोराच्या हातात बेड्या

सायकलप्रेमी चोराच्या हातात बेड्या

Subscribe

तो सोसायटीच्या, सोसायटी पालथ्या घालायचा. परदेशी बनावटीच्या महागड्या सायकलच तेवढ्या हेरायचा. रात्रीच्या वेळी तेथे जाऊन त्या सायकल तो पळायचा. अशा एक नव्हेतर तब्बल १७ महागड्या सायकल त्याने चोरल्या होत्या.

तो सोसायटीच्या, सोसायटी पालथ्या घालायचा. परदेशी बनावटीच्या महागड्या सायकलच तेवढ्या हेरायचा. रात्रीच्या वेळी तेथे जाऊन त्या सायकल तो पळायचा. अशा एक नव्हेतर तब्बल १७ महागड्या सायकल त्याने चोरल्या होत्या. पण पोलिसांनी त्याला हुडकून काढले आणि बेड्या ठोकल्या. या सायकलप्रेमी चोराचे नाव मोहम्मद आरिफ मोहम्मद शरीफ अन्सारी आहे. तो फक्त २५ वर्षांचा आहे.

ज्युजर मोईज भारमल हे व्यापारी अंधेरीतील मरोळ परिसरात राहतात. त्यांनी आपला मुलगा हुसैन याच्यासाठी फॉरमॅट कंपनीची एक महागडी सायकल खरेदी केली होती. जून महिन्यांत ही सायकल त्यांच्या घरासमोरुन कोणीतरी चोरी केली. त्यांनी त्याची तक्रार पोलिसांकडे केली. अंधेरी परिसरातून अशाच काही सायकल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या सायकल प्रेमी चोराला पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली.

- Advertisement -

ही शोधमोहीम सुरु असतानाच शनिवारी मोहम्मद आरिफला रात्रीच्या संशयास्पद फिरताना पवई पोलिसांच्या एका विशेष पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्याने ही सायकल चोरी केल्याची कबुली दिली. गेल्या तीन महिन्यांत त्याने पवई, मरोळनाका, जे. बी नगर, एमआयडीसी आणि अंधेरी परिसरातून अनेक महागड्या सायकली चोरी केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याच्याकडून चोरी केलेल्या एक लाख चार हजार रुपयांचे सतरा सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याच गुन्ह्यांत मोहम्मद आरिफ हा पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या पथकातील दिलीप धामुणसे, सातवसे, विनोद लाड, कुंभार, जगताप, गलांडे, देसाई, घोडेकर, जगताप, बांदकर, गलंडे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -