घरक्राइमBreaking: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर क्रिकेटच्या स्टम्पने जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल

Breaking: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर क्रिकेटच्या स्टम्पने जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल

Subscribe

Attacked On Sandeep Deshpande | दादरच्या शिवाजी पार्कात चार अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. क्रिकेटच्या स्टॅम्पने डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

Attacked On Sandeep Deshpande | मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळीच जीवघेणा हल्ला कऱण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी पार्कात (Shivaji Park) चार अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. क्रिकेटच्या स्टम्पने (Cricket Stump) डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सध्या ते सुखरुप असून पुढील उपचारांसाठी हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारांसाठी दाखल झाले असून शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – पटलं तर घ्या, नाही पटलं तर, संदीप देशपांडेंचे राऊतांना पत्र

- Advertisement -

मनसे नेते संदीप देशपांडे सातत्याने पक्षाची भूमिका घेत असतात. तसंच, विविध पक्षांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. आज ते सकाळी नेहमीप्रमाणे वॉकला गेले असता शिवाजी पार्कात चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. संदीप देशपांडे आज एकटेच वॉकला गेल्याने तबा धरून बसलेल्या भ्याड हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता, त्यामुळे त्यांना ओळखता आलेले नाही. मात्र, शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी तातडीने पावले उचलली असून तपास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हल्लेखोरांना लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

दरम्यान, संदीप देशपांडे यांच्या डोक्यावर क्रिकेट स्टम्पने मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, संदीप देशपांडे यांनी हा हल्ला तत्काळ उलटवून लावल्याने त्यांचे प्राण वाचले. हल्लेखोरांच्या हातापायीत संदीप देशपांडे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मनसे नेते संतोष धुरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – योग्य वेळी न्याय न मिळणं, हा अन्यायच!, संदीप देशपांडे असं का म्हणाले?

संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी जोर धरतेय. तसंच, शिवाजी पार्कात दिवसाढवळ्या असा हल्ला झाल्याने दादरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून हा राजकीय हल्ला असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबतची अधिकची माहिती मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -