Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी प्रकल्पग्रस्तांसाठी माहुलऐवजी पवई, मरिन लाईन्स येथे ३०० चौ.फुटांची घरे, महानगरपालिकेचा मोठा निर्णय

प्रकल्पग्रस्तांसाठी माहुलऐवजी पवई, मरिन लाईन्स येथे ३०० चौ.फुटांची घरे, महानगरपालिकेचा मोठा निर्णय

मुंबई महापालिकेला त्यांच्या विविध प्रकल्पांअंतर्गत बाधित होणाऱ्यांसाठी ३० हजार घरांची आवश्यकता

Related Story

- Advertisement -

मुंबईत विविध प्रकल्पांअंतर्गत बाधित होणार्यांची सुविधा नसलेल्या माहुल येथे पुनर्वसित होण्याची परवड थांबणार आहे. महानगरपालिका आगामी काळात प्रकल्प बाधितांसाठी पवई, मरिन लाईन्स, भायखळा, मानखुर्द, दहिसर या ठिकाणी प्रत्येकी ३०० चौ. फुटांची १२ हजार घरे बांधणार आहे. त्यामुळे मुंबईत रस्ता, नाला, मेट्रो रेल्वे, मिठी नदी रुंदीकरण आदी विविध कारणास्तव बाधित होणाऱ्यांना यापुढे माहुल सारख्या गौरसोयीच्या ठिकाणी पर्यायी घरात राहायला जाण्याची गरज भासणार नाही. एकप्रकारे प्रकल्प बाधितांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शहर व उपनगरातील प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबईतच घरे उभारण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी सांगितले. मुंबईत कुठेही रस्ता, नाला, नदी रुंदीकरण, मेट्रो रेल्वे आदी प्रकल्पाअंतर्गत बाधित होणाऱ्या कोणालाही त्याच प्रकल्पाच्या ठिकाणी अथवा आजूबाजूच्या परिसरातच पुनर्वसित करण्यासाठी पालिकेकडे तेवढ्या पीएपी नाहीत. तसेच, प्रकल्प बाधितांसाठी नव्याने घरे उभारण्यासाठी तशी जागाही उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने संबंधित प्रकल्प बाधितांना पालिकेकडे उपलब्ध असलेल्या माहुल सारख्या गैरसोयीच्या ठिकाणी पुनर्वसित व्हावेच लागते. अशा प्रकल्प बाधितांसाठी स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार हे सर्व राजकीय शक्ती पणाला लावून जोरदार प्रयत्न करतात ; मात्र पालिकेकडील पर्यायाशिवाय दुसरी व्यवस्था होणे कठीण होते.

- Advertisement -

मात्र आता पालिकेकडे प्रकल्प बाधितांसाठी पवई, मरिन लाईन्स, भायखळा, मानखुर्द, दहिसर या ठिकाणी प्रत्येकी ३०० चौ. फुटांची १२ हजार घरे देण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने यापुढे प्रकल्प बाधितांना सुगीचे दिवस येणार आहेत. मुंबई महापालिकेला त्यांच्या विविध प्रकल्पांअंतर्गत बाधित होणाऱ्यांसाठी ३० हजार घरांची आवश्यकता आहे. या घरे उभारणीच्या कामांसाठी पालिकेने निविदाही काढल्या. मात्र निविदाकारांनी फक्त २२ हजार घरांसाठीच प्रतिसाद दिला असून त्यापैकी १२ हजार घरे पवई, मरिन लाईन्स, भायखळा, मानखुर्द, दहिसर या ठिकाणी बांधण्यासाठी पालिकेने प्रक्रिया सुरू केली असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी सांगितले.

मुंबई महापालिका प्रकल्प बधितांसाठी शहर भागातील पॉश विभाग असलेल्या मरीन लाइन्स येथे १,५४१ घरे, भायखळा येथे २,७०० घरे, तर पूर्व उपनगरातील मानखुर्द भागात ३,००० घरे, पवई भागात ३,५०० घरे आणि पश्चिम उपनगरातील दहिसर भागात २०० घरे उभारणार आहे.

- Advertisement -