घरमहाराष्ट्रपुणेमुंबई-पुणे महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई-पुणे महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर 24 तास सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत.

मुंबई – पुणे महामार्ग हा नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांच्या घटना घडत असतात. अपघात झाल्यानंतर अनेकांना जीवसुद्धा गमवावा लागतो. काही महिन्यांपूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा देखील या महार्गावर दुर्दैवी अपघात झालेत्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे आता अशाप्रकारचे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर 24 तास सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार असून, एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे.

24 तास सुरक्षा पथक तैनात
मुंबई – पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई – पुणे महामार्गावर 24 तास सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण बारा पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. १ डिसेंबरपासून मुंबई – पुणे महामार्गावर सुरक्षा पथक तैनात करण्यात येणार आहेत. त्याच सोबत काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. रोज होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. लाईन कटिंग हे मुंबई – पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघाताच प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. लाईन कटिंगला आळा बसावा यासाठी देखील शासनातर्फे उपाययोजना करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

मुंबई – पुणे महामागार्वर वाढत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महामार्गावर पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. ही पथके या ठिकाणी 24 तास उपलब्ध असणार आहेत. यामुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहेच पण त्या सोबतच जर एखादा अपघात झाला, तर अपघातग्रस्तांना त्वरित मदतसुद्धा मिळणार आहे.


हे ही वाचा –  सदानंदाचा यळकोट! चंपाषष्ठी निमित्त भाविकांचा जेजुरीच्या खंडोबा मंदिरात जल्लोष

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -