‘हे खूप मोठ रॅकेट आहे, पण सत्य समोर आणणारचं’- साहील खान

राजने साहीलला मनोजचे काही व्हिडीओ व स्टेराॅईडचे बिल सोशल मीडीयावर पोस्ट करायला सांगितले. तसेच राजने मनोजकडे पैसे परत मागितले. पण मनोजने ते दिले नाहीत.

मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच मनोजने सुसाईड नोटमध्ये अभिनेता साहील खानने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. यावर साहील खानने स्पष्टीकरण दिले असून मनोज एक्सपायरी डेट उलटून गेलेले स्टेरॉईड विकायचा. हे खूप मोठं रॅकेट असून मी सत्य बाहेर आणणारचं असा दावा केला आहे. साहीलच्या या दाव्यामुळे मनोज पाटील आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून बॉलीवूडनंतर बॉडी बिल्डींग क्षेत्राचेही ड्रग्ज कनेकश्न आहे का अशी चर्चा आात रंगली आहे.

मनोजने विषारी औषध घेण्याआधी सुसाईड नोट लिहली होती. जी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात मनोजने साहील खानने सोशल मीडियावर आपली बदनामी केली असून आपलं करियरही धोक्यात आल्याचं म्हटलं होतं. साहील माझा मानसिक छळ करत असल्यानेच आपण आत्महत्या करत असल्याचं मनोजने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. मनोजच्या या सुसाईड नोटने साहील खान अडचणीत आला आहे. मनोजच्या आधी अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नीनेही साहीलविरोधात पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. आक्रमक स्वभाव आणि बॉडी बिल्डींगमुळे साहीलचा वेगळा चाहता वर्गही आहे. यामुळे मनोजच्या आरोपानंतर साहीलने गुरुवारी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी साहील म्हणाला ‘जर माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर मुंबई पोलीस माझ्याविरोधात जी कारवाई करतील ती मला मान्य आहे. जर मी चुकीचे काम केले असेल तर मला शिक्षा मिळायलाच हवी. पण जर मी चुकीचा नसेल तर हे मोठ रॅकेट असून याच पर्दाफाश मी करणारच. माझ्यावर अनेक चुकीचे आरोप करण्यात आले आहेत. असे सांगत साहीलने मी पोलिसांना सगळ सत्य सांगणार असल्याचे म्हटले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

मिस्टर इंडिया झाल्यानंतर मनोज अनेक जणांचा फिटनेस ट्रेनर झाला आहे. यात सामान्य तरुणांपासून सेलिब्रिटीजचाही समावेश आहे. मनोजने राज फौजदार नावाच्या एका व्यक्तीला बॉडी बिल्डींगसाठी २ लाख रुपयांचे स्टेरॉईड विकले होते. पण त्यानंतर राजला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला हृदयासंबंधी आणि त्वचासंबंधी तक्रारी होत्या. तपासात मनोजने एक्सापायरी डेट संपलेले स्टेरॉईड राजला विकल्याचे समोर आले. त्यानंतर राजने साहीलला मनोजचे काही व्हिडीओ व स्टेराॅईडचे बिल सोशल मीडीयावर पोस्ट करायला सांगितले. तसेच राजने मनोजकडे पैसे परत मागितले. पण मनोजने ते दिले नाहीत. अशी माहिती साहीलने पत्रकार परिषदेत दिली आहे.