घरदेश-विदेशचंदा कोचर-दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

चंदा कोचर-दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Subscribe

न्यायालयाने आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांची प्रत्येकी एक लाख रुपयांच्या रोख जामिनावर सुटका केली. सीबीआयने त्यांच्या सुटकेला विरोध केला

मुंबईः ICICI कर्ज प्रकरणात चंदा कोचर-दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ICICI बँक-व्होडाफोन कर्ज फसवणूक प्रकरणात ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. कोचर दाम्पत्याची अटक कायद्यानुसार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

न्यायालयाने आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांची प्रत्येकी एक लाख रुपयांच्या रोख जामिनावर सुटका केली. सीबीआयने त्यांच्या सुटकेला विरोध केला होता. ICICI बँक-व्हिडीओकॉन कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने कोचर दाम्पत्याला अटक केली होती, त्यानंतर व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

- Advertisement -


काय आहे संपूर्ण प्रकरण?
ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून व्हिडीओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले. व्हिडीओकॉन समूहाला ICICI बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर धूत यांनी 2012 मध्ये NewPower Renewables Pvt Ltd (NRPL) मध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. आयसीआयसीआयकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दोन नातेवाईकांसह धूत यांनी ही फर्म सुरू केली. अज्ञाताने दिलेल्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. जानेवारी 2019 मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने वेणुगोपाल धूत, चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्यावर गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. फेब्रुवारी 2019 मध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही दाखल केला होता.


हेही वाचाः झोमॅटोच्या जाहिरातीचा हवाला देत जयंत पाटलांचा थेट शिंदे-फडणवीसांवर निशाणा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -