घरताज्या घडामोडीVideo: आमदार आदित्य ठाकरेंकडून भ्रमनिरास? वरळीकरांनी केला मनसेत प्रवेश

Video: आमदार आदित्य ठाकरेंकडून भ्रमनिरास? वरळीकरांनी केला मनसेत प्रवेश

Subscribe

विधानसभा निवडणुकीला एक वर्ष होण्याच्या आतच वरळीकरांनी निवडून दिलेल्या आमदारावर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे. ठाकरे घराण्यातून पहिल्यांदा निवडणूक लढविणारा नेता, असा बहुमान मिळवत आदित्य ठाकरेंनी विजय मिळवला खरा. मात्र वरळीकर त्यांच्या नेतृत्वावर समाधानी नसून त्यांनी आदित्यच्या काकांच्या म्हणजेच राज ठाकरेंच्या मनसेला पसंती दिली आहे. मनसे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वरळीकरांनी आज मनसेत जाहीर प्रवेश केला. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानावर हा पक्षप्रवेश पार पडला. वरळीमधील सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे आणि इतर नागरिकांनी मनसेत प्रवेश घेतला असल्याची माहिती संतोष धुरी यांनी दिली. ते म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांना वरळीकरांनी निवडून दिले. लोकप्रतिनिधी लोकांमधला असावा अशी जनतेची अपेक्षा असते. पण आदित्य ठाकरेंकडून काही महिन्यातच वरळीकरांचा भ्रमनिरास झाला आहे. सध्या कोणतीही निवडून नाही तरीही वरळीतील अनेक नागरिकांनी राज ठाकरेंच्या मनसेला जवळचे मानत प्रवेश केला आहे.”

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात नाराजी?

आदित्य ठाकरे यांनी जेव्हा वरळीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तेव्हा विद्यमान आमदार सुनील शिंदे यांना बाजुला सारण्यात आले होते. अद्याप त्यांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. वरळी हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असताना देखील आदित्य ठाकरे मतदारसंघात फिरकले नाहीत. याच मतदारसंघातील नगरसेविका असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर याच एकट्या फिरत होत्या. मुंबईचे पालकमंत्री असूनही लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण आदित्य ठाकरेंना करता आले नाही, असा एक आरोप विरोधक करत आहेत.

- Advertisement -

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने अनपेक्षितपणे काँग्रेस-राष्ट्रवादीची कास धरत महाविकास आघाडी स्थापन करुन सत्ता हस्तगत केली. निवडणुकीआधी आघाडीकडे झुकलेले राज ठाकरे महाविकास आघाडीच्या शपथविधीनंतर पुन्हा ‘एकला चलो रे’चा नारा देत पुढे चालले. शिवसेनेचा भगवा अवलंबत त्यांनी सेनेसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे केले. याचाच भाग म्हणून त्यांनी शॅडो मंत्रिमंडळाची देखील स्थापना केली. तसेच राज्यभरातून शिवसेनेने अडगळीत टाकलेल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पक्षप्रवेश करण्याची साद घातली. याचाच भाग म्हणून औरंगाबाद, मुबंई, पुणे अशा विविध जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते हे मनसेत डेरेदाखल झाले. फेब्रुवारी महिन्यातच औरंगाबादचे सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू सुहास दशरथे यांनी मनसेत प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -