घरCORONA UPDATEविकृत! कलिना परिसरात मणिपुरी मुलीवर 'तो' चक्क थुंकला, पोलिसात गुन्हा दाखल

विकृत! कलिना परिसरात मणिपुरी मुलीवर ‘तो’ चक्क थुंकला, पोलिसात गुन्हा दाखल

Subscribe

मुंबईतील कलिना परिसरात एक मणिपुरी मुलीवर बाईकवरून आलेल्या इसकाने थुंकण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

मुंबईतील कलिना परिसरात एक मणिपुरी मुलीवर बाईकवरून आलेल्या इसकाने थुंकण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. काल सायंकाळी ही घटना कलिनामध्ये घडली असून बाईकवरून आलेला तो विकृती मणिपुरी मुलीवर थुंकून तिथून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेसंबंधी वाकोला पोलीस ठाण्यात त्या माणसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या मणिपुरी मुलीच्या मदतीने घटनेच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासत आहे. तसेच त्या इसमाचा शोध घेतला जात आहे. सध्या जगभरात कोरोना या रोगाचे थैमान घातले आहे. हा विषाणू चीन देशातून इतरत्र पसरला आहे. त्यामुळे लोकांमध्ये चीनबाबत प्रचंड संताप आहे. काहींनी तर अनेकदा आपला राग सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तही केला आहे. मात्र आपल्याच देशातील मणिपूर प्रांतच्या मुलीवर चीनी लोकांच्या रागामुळे असे कृत्य करणे लाजीरवाणे असल्याचे आता सर्व स्तरातून बोलले जात आहे.

- Advertisement -

चीनवरचा राग मणिपुरी मुलीवर 

कोरोनाच्या संसर्ग देशात झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे लोकांचे काम आणि त्यातून मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. याचा राग हा ओघाने कोरोना आलेल्या चीन देशावर काढला जात आहे. जागतिक स्तरावर देखील अनेक देशांनी या महामारीसाठी चीनला दोषी ठरवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर अनेकदा हा चीनी व्हायरल असल्याचे जाहीर म्हटले आहे. हा व्हायरल पसरवण्यामागे चीनचे षडयंत्र असून त्याला सर्वात श्रीमंत देश बनायचे असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांना देशोधडीला लावणारा आणि लाखोंच्या संख्येने लोकांचा बळी घेणारा हा विषाणू चीन मधून आल्याचे त्यांच्या राग राग केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कलिनातील कालची घटना बेतल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -