मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी – अजिप पवार गटाचे नेता बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी मुंबई गुन्हे शाखेने पूर्ण केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. तब्बल 4 हजार 590 पानांच्या या आरोपपत्रात मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईसह 26 लोकांची यात नावे असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bishnoi gang targeted exminister baba siddique for being close to salman khan mumbai police chargesheet says)
मुंबईत आपली दहशत कायम राहावी यासाठी बिश्नोई गँगने ही हत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासाअंती काढला आहे. तसेच मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेशी संबंधित वादाचा या हत्याकांडाशी काहीही संबंध नसल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Crime : गृहपाठाच्या भीतीने 11 वर्षाच्या मुलांनी रचली अपहरणाची कथा, पण…; असा झाला उलगडा
पोलिसांनी सोमवारी या प्रकरणी अटक करण्यात आलेले 26 आरोपी, सध्या तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि अन्य 3 वॉन्टेट आरोपींविरोधात विशेष न्यायालयात 4 हजार 590 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रानुसार, आपली दहशत कायम राहावी तसेच आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनमोल बिश्नोईने सिद्दिकींना मारण्याचे ठरवले.
पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 26 लोकांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी – मकोक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सध्या सगळे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
महाराष्ट्राचे माजी मंत्री सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या दिवशी मुंबईतील बांद्रा भागात हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. प्रमुख हल्लेखोर गोळ्या झाडल्यानंतर पळून गेला होता. नंतर त्याला गुन्हे शाखेने अटक केली.
हेही वाचा – Mukesh Chandrakar : क्रूरतेचा कळस; ठार मारण्यापूर्वी मुकेश चंद्राकारचे केले हाल; शवविच्छेदन अहवाल काय सांगतो
बाबा सिद्दिकी हे अभिनेता सलमान खान याचे निकटवर्तीय मानले जातात. सलमान खानवर बिश्नोई समाजाचा आधीपासून राग आहे. या समाजासाठी पूज्यनीय असलेले काळवीट मारल्याचा आरोप सलमान खानवर आहे. याशिवाय सिद्दिकी हे दाऊद इब्राहिमच्याही जवळचे असल्याचा आरोपींचा अंदाज होता. त्यामुळे देखील त्यांची हत्या करण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.