घरमुंबईराहुल गांधी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा भाजपाचा आरोप

राहुल गांधी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा भाजपाचा आरोप

Subscribe

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) एका रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला असून काँग्रेसने तातडीने देशाची माफी मागावी, अन्यथा भाजपा काँग्रेसविरोधात आंदोलन करेल, असा इशारा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज (23 मे) दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, चैनसुख संचेती , प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते.

राहुल गांधी यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ते पदयात्रा करत जनतेशी संवाद साधत आहेत आणि या व्हिडिओच्या मागे जे गाणे लावण्यात आले आहे त्यावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला असून  काँग्रेसने देशाची माफी अन्यथा भारतीय जनता पार्टी काँग्रेस विरोधात आंदोलन करेल, असा इशारा बावनकुळे यांनी केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडून प्रसारीत केल्या गेलेल्या एका व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आली आहे. या प्रकाराबद्दल काँग्रेसने तातडीने देशाची माफी मागावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी याविरोधात आंदोलन करेल.

- Advertisement -

शरद पवार यांना जनतेची दिशाभूल करण्याची सवय
बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या देशद्रोही दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांचा आणि नवाब मलिक यांच्या अटकेचा काहीही संबंध नाही. मात्र शरद पवार यांना जनतेची दिशाभूल करण्याची सवय आहे. या सवयीतूनच पवार यांनी नवाब मलिक यांच्या अटकेबाबत चुकीची माहिती दिली आहे. पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जनतेत या पद्धतीने संभ्रम पसरवू नये, असे बावनकुळे म्हणाले.

अनिल देशमुख यांची न्यायालयाकडे तक्रार करू
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. परंतु देशमुखांवरील आरोपांची सुनावणी न्यायालयात अजूनही सुरु आहे. तरीही ते न्यायालयाबाबत मतप्रदर्शन करीत असल्याने न्यायालयाचा अवमान होत आहे. त्यामुळे देशमुख यांनी याबाबत जाहीर वक्तव्ये न थांबविल्यास न्यायालयाकडे त्यांची तक्रार करू, असा इशारा बावनकुळे यांनी देशमुखांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -