घरमुंबईमुंबई पालिकेच्या १५८४ कोटींच्या नुकसानाला जबाबदार कोण?; भाजप गटनेत्याचं आयुक्तांना पत्र

मुंबई पालिकेच्या १५८४ कोटींच्या नुकसानाला जबाबदार कोण?; भाजप गटनेत्याचं आयुक्तांना पत्र

Subscribe

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरु केली असून सत्ताधारी शिवसेनेला घेरण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये महापालिकेच्या १ हजार ५८४ कोटींच्या नुकसानाला जबाबदार कोण? असा सवाल केला आहे.

चांदिवली येथील भूखंडावर प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी सुमारे ४००० सदनिका बांधणे, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भूखंडासहित सदनिका संपादित करण्यासाठी मंजूर केलेल्या निविदेत झालेल्या गैरव्यवहारामुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक नुकसान झालं आहे, असं प्रभाकर शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

उपरोक्त प्रस्तावाद्वारे महापालिकेस ३०० चौ. फुटाच्या ४००० सदनिका प्रकल्पग्रस्तांसाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र, या निविदेसाठी चार निविदाकारांनी नकार दिला आहे. त्यातील लघुत्तम देकार डी.बी. रिएल्टी कंपनीचा प्रती सदनिका रु.३५, १०, ००० असतानाही या लघुत्तम निविदाकारास डावलून द्वितीय लघुत्तम निविदाकार डी.बी. एस. रिएल्टी यांना रु. ३९, ६०, ००० म्हणजेच रुपये साडे चार लाख अधिक किंमतीच्या सदर निविदेचे काम का प्रदान करण्यात आले? असा सवाल प्रभाकर शिंदे यांनी पत्राद्वारे केला आहे. याशिवाय, प्रस्तावात कुठलाही उल्लेख अथवा स्पष्टीकरण का दिलेले नाही? हा अर्धवट अस्पष्ट प्रस्ताव बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? असे प्रश्न प्रभाकर शिंदे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे विचारले आहेत.

पत्राद्वारे ९ प्रश्न उपस्थित केलेत

१) प्रस्तावात पान क्र.०७ वर नमूद केल्याप्रमाणे परिमंडळ ०५ मधील निविदा क्र.७१००१८१२४६ साठी चार निविदाकारांनी देकार दिला आहे. त्यातील लघुत्तम देकार डी.बी. रिएल्टी कंपनीचा प्रती सदनिका रु.३५,१०,००० /- असतानाही या लघुत्तम निविदाकारास डावलून द्वितीय लघुत्तम निविदाकार डी.बी. एस. रिएल्टी यांना रु. ३९,६०,०००/- म्हणजेच रुपये साडे चार लाख अधिक किंमतीच्या सदर निविदेचे काम का प्रदान करण्यात आले?

- Advertisement -

२) याबाबत प्रस्तावात कुठलाही उल्लेख अथवा स्पष्टीकरण का दिलेले नाही?

३) हा अर्धवट अस्पष्ट प्रस्ताव बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार?

४) यशस्वी निविदाकारास आपण जमीन विकास हस्तांतरण क्षेत्र (Land TDR ) + बांधकाम विकास हस्तांतरण क्षेत्र (Construction TDR) + महापालिका विकास शुल्कात सवलत + अधिमुल्य देणार आहोत. यशस्वी निविदाकाराला महापालिका विकास शुल्कात नक्की किती टक्के सवलत देण्यात येणार आहे?
५) महापालिकेला प्रकल्पबाधितांसाठी सदनिका देणाऱ्या निविदाकारास जमिनीचा टीडीआर + बांधकाम टीडीआर+ विकास शुल्क सवलत + अधिमुल्य म्हणजे प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मिळणारा आर्थिक फायदा नक्की किती पट जास्त होणार आहे?

६) चांदिवली न.भू.मा.क्र.११ए / ५ए येथे आजचा जमीन व बांधकामाचा सिद्धगणक दर किती आहे?

७) ३०० चौ. फुटाच्या सदनिकेस रु.३९,६०,०००/- म्हणजे रु.१३,२००/- प्रती चौरस फुटाचा भाव हा तेथील बाजारभावापेक्षा जास्त आहे. हि वस्तुस्थिती नाही का ? या भागात आमच्या माहिती प्रमाणे बाजारभाव रु.सात ते आठ हजार प्रती चौ. फुट आहे.

८) रु.१३,२०० चौ. फुट म्हणजेच रु.१,४२,०८४ /- प्रती चौ. मी. हा दर शासकीय सिद्धगणक दर व बाजारभाव यापेक्षा जास्त नाही का?

९) यशस्वी निविदाकारास बाजारभावाने अधिमुल्य + जमिन टीडीआर + बांधकाम टीडीआर + विकास शुल्क सवलत यामुळे प्रती चौ. फुट रु.१३,२०० + रु. ८,०००/- = रु.२१,२००/- प्रती चौ. फुट असा बाजारभावापेक्षा दुप्पट मोबदला महापालिका देत आहे. यामुळे महापालिकेचे जवळपास रु.१५८४ कोटींचे नुकसान होणार आहे. याला जबाबदार कोण?

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -