भाजप-मनसे युतीचे संकेत, राज ठाकरे करणार घोषणा?

यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवून मनसे भाजपबरोबर युती करेल अशी शक्यता राजकीय वर्तृळात वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एक महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठी माणसाच्या मुद्द्यानंतर हिंदूत्वाच्या मुद्दयावर आक्रमक भूमिका घेणाऱे राज ठाकरे १ ते ९ मार्च दरम्यान अय़ोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवून मनसे भाजपबरोबर युती करेल अशी शक्यता राजकीय वर्तृळात वर्तवली जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेची बैठक सुरू आहे. राज ठाकरेंसह, अमित ठाकरेही पत्नी मितालीसह या बैठकीस आले आहेत. या बैठकीत महापालिका निवडणुकांसर्दभात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून अयोध्या दौऱ्यांसंबंधीही या बैठकीत चर्चा होणार आहे.
दरम्यान, भाजप व शिवसेनेमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे भाजपने महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मनसेशी जवळीक वाढवली आहे. यामुळे मनसे व भाजप युतीचेच एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.