Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी उद्यान जन्माला येण्यापूर्वीच नामकरणाचा घाट; उद्यानाची जागा पडली उजाड

उद्यान जन्माला येण्यापूर्वीच नामकरणाचा घाट; उद्यानाची जागा पडली उजाड

भाजप व शिवसेना यांच्यात या उद्यानाच्या नामकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

Related Story

- Advertisement -

गोवंडी येथील मुंबई महापालिकेच्या उद्यानाला वादग्रस्त टिपू सुलतानचे नाव देण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र, ते उद्यान अद्याप तयारही करण्यात आलेले नाही. या उद्यानाची एक वीटसुद्धा रचलेली नाही. उद्यानाची जागा उजाड पडली आहे. या जागेवर पावसाचे पाणी साचले असून या जागेचा वापर टॅक्सी पार्क करण्यासाठी करण्यात येत असल्याची धक्कादायक व गंभीर बाब चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे हा एकूणच प्रकार जरी गंभीर असला तरी उद्यानाचा जन्मच झालेला नसताना त्याच्या नामकरणाचा गाजावाजा सुरू आहे.

गोवंडी विभागात समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी, महापालिकेच्या उद्यानाला ‘टिपू सुलतान उद्यान’ असे नाव देण्याची मागणी बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत जानेवारी २०२१ रोजी केली होती. त्यावर पालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय देत त्याबाबतचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीच्या मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र, १५ जुलै रोजी पार पडलेल्या बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत सदर प्रस्तावावरून मोठा गदारोळ झाला होता. भाजप नगरसेवकांनी सदर प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती, तर शिवसेनेने सदर प्रस्ताव अपूर्ण असल्याचे कारण देत तो परत प्रशासनाकडे पाठवला.

- Advertisement -

भाजप व शिवसेना यांच्यात या उद्यानाच्या नामकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. भाजपने या प्रकरणावरून शिवसेनेला डिवचल्याने महापौर किशोरी पेडणेकर या आक्रमक झाल्या. त्यांनी २०१३ मध्ये टिपू सुलतानचे नाव गोवंडी येथील एका रस्त्याला देण्याबाबत सादर प्रस्तावाला भाजपचे नगरसेवक अमित साटम यांनीच अनुमोदन दिल्याचे प्रकरण उघडकीस आणले. मात्र, त्यावर भाजपचे तत्कालीन नगरसेवक व आताचे आमदार अमित साटम यांनी, तीव्र आक्षेप घेऊन महापौरांनी खोटी माहिती दिल्याचे सांगत याप्रकरणी सत्य माहिती सादर न केल्यास अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

त्यामुळे उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आता भाजपचे प्रवक्ते व स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी, शनिवारी सदर वादग्रस्त उद्यानाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली असता त्या जागेवर उद्यान काय, उद्यानाची एक वीटसुद्धा रचण्यात आलेली नसल्याची गंभीर व धक्कादायक बाब समोर आली आहे.

- Advertisement -