घरमुंबईमुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; आशिष शेलारांवर सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; आशिष शेलारांवर सोपवली मोठी जबाबदारी

Subscribe

यात खासदार पूनम महाजन यांची समितीच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे तर समितीचे अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेला ठक्कर देण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महापालिकेवर भाजपचे कमळ फुलवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली जात आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने समित्यांची स्थापना केली आहे. यात निवडणूक संचालन समितीसह २५ समित्या आहेत. यातील प्रत्येक समितीचा अध्यक्ष आणि सदस्यांना काही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये आमदार आशिष शेलार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडणूक संचालन समितीचे अध्यक्षपद भाजप नेते व आमदार ऍड आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार आहे. या निवडणुक संचालन समितीमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पुनम महाजन आणि मनोज कोटक आणि किरीट सोमय्या हे विशेष निमंत्रत असतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यात खासदार पूनम महाजन यांची समितीच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे तर समितीचे अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या तयारीच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चर्चा करुन २५ समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नावे शुक्रवारी रात्री जाहीर केली. यात माध्यम विभाग समिती अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची प्रशासन समन्वयपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर आचार्य पवन त्रिपाठी आणि आमदास विद्या ठाकूर यांच्याकडे विशेष संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवली आहे. महिला संपर्क समितीची जबाबदारी शलाका साळवी, शीतल गंभीर यांच्याकडे असू संजय पांडे यांच्याकडे प्रवाशी कार्यकर्ता समितीची जबाबदारी आहे.

- Advertisement -

समितीचे नाव, प्रमुख आमि समित्याचे सदस्य खालीलप्रमाणे :-

1) निवडणूक संचालन समिती

अध्यक्ष : आमदार ऍड आशिष शेलार

- Advertisement -

सदस्य
आमदार कालिदास कोळंबकर, माजी आमदार प्रकाश मेहता, आमदार राहुल नार्वेकर, आमदार नितेश राणे


2) जाहिरनामा समिती

अध्यक्ष : खासदार पूनम महाजन

सदस्य
आमदार योगेश सागर, आमदार सुनील राणे, आमदार राजहंस सिंह, आर.यु. सिंह, महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे

3) प्रशासन समन्वय

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर

4) प्रसार माध्यम व समाज माध्यम समिती

अध्यक्ष : आमदार अतुल भातखळकर

सदस्य
आमदार राम कदम, अमरजीत मिश्रा, ऍड विवेकानंद गुप्ता

5) झोपडपट्टी संपर्क सामिती

खासदार गोपाळ शेट्टी, आर.डी. यादव, तृप्ती सावंत

6) संसाधन

खासदार मनोज कोटक

7) आरोपपत्र समिती

अध्यक्ष : आमदार अमित साटम

सदस्य
भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा

8) बाह्य प्रसिध्दी समिती

आमदार पराग अळवणी

9) प्रसिध्दी सामुग्री व्यवस्थापन समिती

आमदार मिहिर कोटेचा आणि आमदार पराग शाह

10 ) बुथ संपर्क

संजय उपाध्याय

11) निवडणूक आयोग संपर्क

प्रकाश महेता आणि कृपाशंकर सिंह

12) ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क

आमदार भाई गिरकर

13) वॉर रुम

प्रतिक कर्पे

14) ओबीसी संपर्क समिती

आमदार मनिषा चौधरी

15) उत्तर भारतीय संपर्क समिती

जयप्रकाश ठाकूर, आर.यू.सिंह, अमरजित सिंह, जयप्रकाश सिंह, ज्ञानमूर्ती शर्मा

16) व्यापारी व छोटे व्यावसायिक संपर्क समिती

राज पुरोहित

17) दक्षिण भारतीय संपर्क समिती

आमदार कॅप्टन सेल्वन्

18) श्रमिक संपर्क (असंघटीत)

हाजी अराफत शेख

19) विशेष संपर्क समिती 

आमदार विद्या ठाकूर आणि आचार्य पवन त्रिपाठी

20) अनुसूचित जाती मोर्चा संपर्क समिती

शरद कांबळे

21) अल्पसंख्यांक संपर्क समिती

वसीम खान

22) नव मतदार संपर्क समिती 

तेजिंदर सिंग तिवाना, पल्लवी सप्रे, आरती पुगांवकर

23) महिला संपर्क समिती 

शलाका साळवी आणि शीतल गंभीर

24) प्रवासी कार्यकर्ता समिती 

संजय पांडे


शिवसेनेकडून 2027 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी; राऊतांकडून मिशन जाहीर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -