घरताज्या घडामोडीनालेसफाईत चुका आढळल्यास कंत्राटदारांवर कारवाई करा; आशिष शेलारांचे पालिका आयुक्तांना निवेदन

नालेसफाईत चुका आढळल्यास कंत्राटदारांवर कारवाई करा; आशिष शेलारांचे पालिका आयुक्तांना निवेदन

Subscribe

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत होते. तसेच, सर्वसामान्यांनाही त्याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाल्यांचीसफाई केली जाते. मात्र नाल्यांच्या सफाईनंतरही मुंबईत गुडघाभर पाणी साचते.

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत होते. तसेच, सर्वसामान्यांनाही त्याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाल्यांचीसफाई केली जाते. मात्र नाल्यांच्या सफाईनंतरही मुंबईत गुडघाभर पाणी साचते. या अडचणीपासून यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना निवेदन दिले आहे. (BJP Ashish Shelar Mumbai Nala Safai BMC Commissioner)

भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील नालेसफाई आणि पावसाळ्यात साचलेले पाणी नागरिकांच्या घरात जाणे या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना निवेदन दिले. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आशिष शेलार यांनी नालेसफाईवेळी चुका करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले आशिष शेलार?

“मुंबई महापालिकेत नालेसफाई, नालेसफाईचे कंत्राट, कंत्राटदाराने केले काम, या सगळ्यावर मुंबईकरांची असुरक्षितता याबाबची सर्व माहिती आज मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना दिली. तसेच, ज्या ठिकाणी चुका दिसत आहेत. त्याठिकाणी तातडीने कारवाई करण्याची विनंती मी महापालिका आयुक्तांकडे केली”, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

- Advertisement -

याशिवाय, “नालेसफाईत मुद्दाम कोणी चुका करत असतील तर, त्याच्यावरही कारवाई करावी. तसेच, पावसाळ्यात साचलेले पाणी घरात जाणे, या अडचणींपासून मुंबईकरांची सुटका करावी ही मागणी केली. याबाबतचे निवेदन मी दिले”, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नालेसफाईची पाहणी

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी महापालिकेकडून नाल्यांची सफाई सुरू करण्यत आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रे (पूर्व) परिसरातील मिठी नदी येथून सुरूवात केली होती. त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलातील भारत नगर येथे वाकोला नदीची पाहणी केली. त्या पाठोपाठ दादर मधील प्रमोद महाजन उद्यानातील साठवण टाकीचे बांधकाम, वरळीतील लव्हग्रोव उदंचन केंद्र या ठिकाणी भेट देवून नालेसफाई तसेच पावसाळ्यात पाणी साचणार यासाठीच्या कामांचा आढावा घेतला.


हेही वाचा – KERLA BOMB : देशी बनावटीचे 8 बॉम्ब सापडले, केरळमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -