घरमुंबईरुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी भाजप नगरसेवकांचे उपोषण

रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी भाजप नगरसेवकांचे उपोषण

Subscribe

मुलुंड येथील महापालिकेच्या एम. टी अगरवाल रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे. या रुग्णालयाच्या नुतनीकरणासाठी भाजपचे नगरसेवक लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. या रुग्णालयाच्या पुणर्बांधणीची वारंवार मागणी केली जात होती. तसंच या रुग्णालयाचे नूतनीकरण केले जाणार होते. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी चुकीचे अंदाज पत्रक तयार केल्याने या रुग्णालयाचे बांधकाम रखडले आहे. या रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे स्थानिक नागरिकांसह लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत.

पालिका अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा
एम टी अगरवाल रुग्णालयाच्या पुणर्बांधणीच्या कामासाठी ३ ते ४ निविदा काढण्यात आल्या होत्या. कधी कमी प्रतिसादामुळे तर कधी अंदाजित दरापेक्षा अधिक दरामुळे निविदा बाद करण्यात आल्या. त्यामुळे निविदेतील अंदाजपत्रक चुकीचे असल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप करत प्रकाश गंगाधरे यांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

नूतनीकरणाचे काम रखडले
२०१४ पासून पालिकेने नूतनीकरणाच्या निविदा मागवायला सुरुवात केली होती. एकूण २५ वेळा पालिकेने या हॉस्पिटलची निविदा तयार केली आणि त्रुटी असल्याने ती फायनल केली नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून या रुग्णालयाची मुख्य इमारत बंद आहे. त्यामुळे रुग्णांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे २०० बेडचे असलेले हे रुग्णालय नूतनीकरण झाल्यावर ४५० बेडचे होणार आहे. या रुग्णालयात सर्व अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेने ३०० कोटींची तरतूद देखील केली आहे. पण निविदा प्रक्रिया होत नसल्याने या रुग्णालयाचं नूतनीकरण रखडलं असल्याचा आरोप गंगाधरे यांनी केलाय.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -