स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेविरोधात भाजपचा हल्लाबोल

स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांनी, ' शिवसेना हाय हाय', ' आम्ही तिघे भाऊ भाऊ भ्रष्टाचाराचे पैसे वाटून खाऊ' असे छापील फ्लॅक्सचे अंगरखे परिधान करून निषेध व्यक्त केला. तसेच, स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर सभागृहाच्या आवारात शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करून पालिका मुख्यालय दणाणून सोडले.

BJP Cretisize Shiv Sena in the standing committee meeting
स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेविरोधात भाजपचा हल्लाबोल

मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येत असताना बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांनी, ‘ शिवसेना हाय हाय’, ‘ आम्ही तिघे भाऊ भाऊ भ्रष्टाचाराचे पैसे वाटून खाऊ’ असे छापील फ्लॅक्सचे अंगरखे परिधान करून निषेध व्यक्त केला. तसेच, स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर सभागृहाच्या आवारात शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करून पालिका मुख्यालय दणाणून सोडले.

मुंबईत कोविड काळात वैद्यकीय उपाययोजना, कोविड सेंटर उभारणी , औषधं व वैद्यकीय सामग्री खरेदी आदींवर पालिकेने आजपर्यंत ३ हजार ८०० कोटी रुपये खर्चले आहेत. मात्र त्या सर्व खर्चाबाबत योग्य हिशोब, माहिती पालिका प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे कोविड काळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असून त्याविरोधात भाजप गेल्या दोन वर्षांपासून आवाज उठवत आहे, खर्चाचा हिशोब मागत आहे. मी स्वतः अनेकदा पालिका आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आदींना पत्रे लिहिली व विचारणा केली. स्थायी समिती बैठक व पालिका सभागृहातही या कोविड भ्रष्टाचाराबाबत वारंवार आवाज उठवला मात्र त्याबाबत खरी माहिती दिली जात नाही. त्यामुळे या कोविडवरील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची कॅगद्वारे विशेष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केली.


हेही वाचा – Ghatkopar-Mankhurd Link Road : घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडच्या खर्चाचे ४३७ वरून ७३३ कोटींवर ‘उड्डाण’