घरमुंबईलोकसभा जिंकण्यासाठी भाजपने तीन राज्यात पराभव करून घेतला -शरद पवार

लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने तीन राज्यात पराभव करून घेतला -शरद पवार

Subscribe

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता असतानाही भाजपचा पराभव झाला आणि तेथे काँग्रेस विजयी झाली. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी तर भाजपने या तिन्ही राज्यात स्वत:चा पराभव करून घेतला नव्हता ना? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवर पुन्हा शंका उपस्थित केली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पवारांनी ईव्हीएम मशिनवर शंका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्यामुळे भविष्यात विरोधी पक्षांचा ईव्हीएमविरोध अधिकच तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

’ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. ही तिन्ही राज्ये एकमेकांना लागून आहेत आणि आता भाजप तेथील तत्कालीन सरकार पाडण्याच्या विचारात आहे,’ अशी टीका शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

- Advertisement -

निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. आपले मत योग्य ठिकाणी गेले की नाही याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे, असे ट्विट करत पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आगामी काळात ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विरोधकांनी ईव्हीएम मशिनसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु निवडणूक आयोगाने ते सर्व फेटाळून लावले. आता निवडणुकीच्या निकालानंतरही विरोधक हा मोदींचा विजय नव्हे, तर ईव्हीएमचा विजय असल्याचे सांगत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशिनसंदर्भात प्रश्नचिन्ह विचारले होते. ईव्हीएम मशिनमध्ये कुठलेही बटण दाबल्यास भाजपाला मत जात असल्याचाही त्यांनी आरोप केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -