स्थायी समिती अध्यक्षांवर कारवाई करा, भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

भाजप नगरसेवकांनी पालिका सभागृहात गदारोळ घातल्यानंतर पुन्हा पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या दालनासमोरही 'जागो आयुक्त प्यारे', 'भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा', 'भ्रष्टाचाराला आळा घाला', 'करदात्या मुंबईकरांच्या पैश्याची उधळपट्टी थांबवा', 'मुंबईकरांना सुसह्य जीवन द्या', 'यशवंत जाधवांवर कारवाई करा'अशा घोषणा देत व फलकबाजी करीत तीव्र निदर्शने केली.

BJP demand to Municipal Commissioner Take action against Standing Committee Chairman yashawant jadhav

स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल ६ हजार कोटींचे ३७० प्रस्ताव नियमबाह्यपणे व विनाचर्चा मंजूर करणारे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच, भाजप नगरसेवकांनी पालिका सभागृहात गदारोळ घातल्यानंतर पुन्हा पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या दालनासमोरही ‘जागो आयुक्त प्यारे’, ‘भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा’, ‘भ्रष्टाचाराला आळा घाला’, ‘करदात्या मुंबईकरांच्या पैश्याची उधळपट्टी थांबवा’, ‘मुंबईकरांना सुसह्य जीवन द्या’, ‘यशवंत जाधवांवर कारवाई करा’अशा घोषणा देत व फलकबाजी करीत तीव्र निदर्शने केली.

स्थायी समितीत आलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी होत्या. त्यात स्पष्टता नव्हती. याबाबत कुठलीही चर्चा करण्यास अध्यक्षांनी परवानगी दिली नाही. काही प्रस्ताव आदल्या रात्री आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे. त्यामुळे असे प्रस्ताव मंजूर न करता आयुक्तांनी एक जबाबदार प्रशासक म्हणून पालिकेतील भ्रष्टाचाचाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

भाजप वैफल्यग्रस्त – यशवंत जाधव

स्थायी समितीची ही शेवटची बैठक होती व त्यात सर्वात जास्त विषयांचे प्रस्ताव मंजुरीला आले होते, त्यामुळे मी त्यांना नंतर बोलायला देतो असे सांगून प्रारंभी हरकतीच्या मुद्द्यावर प्रभाकर शिंदे यांना बोलू दिले नव्हते. मात्र त्यामुळे वैफल्यग्रस्त भाजपवाल्यांनी घोषणाबाजी करून व गदारोळ घालून सदर प्रस्तावात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यावेळी केला.

तसेच, स्थायी समितीमध्ये किती कोटींचे व किती प्रस्ताव मंजुरीला आले व कोणकोणते प्रस्ताव मंजूर झाले याला महत्व नसून विकास कामांच्या प्रस्तावांना महत्व असते, असे यशवंत जाधव यांनी यावेळी सांगितले.
भाजप वैफल्यग्रस्त झाल्याने आरोप करीत सुटल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.


हेही वाचा – मी काळजीवाहू महापौर म्हणून काम करणार – महापौर किशोरी पेडणेकर