घरमुंबईपालघरचा गड राखण्यासाठी भाजपची फौज मैदानात

पालघरचा गड राखण्यासाठी भाजपची फौज मैदानात

Subscribe

वसई। वार्ताहर
पालघर लोकसभा पोटनिवडणूक भाजपाने कमालीची प्रतिष्ठेची केली आहे. ही जागा जिंकण्यासाठी देशातील दोन मुख्यमंत्री, पाच मंत्री, २५ आमदार आणि ५० वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची ताकद भाजपाने पणाला लावली आहे.

केव्हा होणार निवडणूक?

- Advertisement -

२८ तारखेला होणाऱ्या पालघर पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चौरंगी लढत होत आहे. केवळ ९ महिन्यांच्या मुदतीसाठी खासदार या जागेवर बसणार आहेत. तरीही भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने पळवल्याचा घाव जिव्हारी लागलेल्या भाजपाने ही जागा जिंकण्यासाठी पक्षातील दिग्गज पदाधिकाऱ्यांना मैदानात उतरवण्याचा घाट घातला आहे.

भाजपची रणनिती

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर पालघर जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी वसई आणि कासामध्ये २ सभा घेतल्या आणि भव्य रॅलीही काढली. २४ तारखेला जव्हार आणि पालघरमध्ये त्यांच्या दोन सभा होणार आहेत. तसेच वसईच्या माणिकपूर मैदानावर २६ तारखेला मुख्यमंत्री श्रमजीवी संघटना आणि जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांशी जाहीर संवाद साधणार आहेत.

योगी आदित्यनाथही मैदानात

वसई-विरार भागात उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रहिवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही वसई-विरारमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या दोन मुख्यमंत्र्यांप्रमाणेच भाजपाचे अनेक मंत्री आणि आमदार या प्रचारात आपली ताकद पणाला लावत आहेत. यात विष्णू सावरा, रिटा बहुगुणा, स्मृती इराणी, रवींद्र चव्हाण या मंत्र्यांसह डॉ. अवधेश सिंह, अनिल मौर्य, निलरतन पटेल, सुशील सिंह, योगेश सागर, नरेंद्र मेहता यांच्यासह अनेक आमदार प्रचारात उतरले आहेत. त्यांच्याबरोबर भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, डॉ.विनय नातू, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गायक कलाकार मनोज तिवारी, विवेक पंडित मतदारांशी संपर्क साधत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -