घरमुंबईशिवसेनेशी पंगा भाजपला पडला महागात; भाजपच्या निधीत मोठी कपात

शिवसेनेशी पंगा भाजपला पडला महागात; भाजपच्या निधीत मोठी कपात

Subscribe

राज्यात व मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेबरोबर विशेषतः स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या बरोबर भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांनी घेतलेला पंगा भाजपला चांगलाच महागात पडला आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना, सर्वपक्षीयांना वाटप करण्यासाठी यंदा ६५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

मात्र या निधीचे वाटप करताना जाधव यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत, शिवसेनेला -२३३ कोटी रुपये, काँग्रेसला ९० कोटी रुपये, राष्ट्रवादीला – २१ कोटी रुपये, समाजवादीला – १८ कोटी रुपये तर भाजपला यंदा फक्त ६० कोटी रुपये इतक्या निधीचे वाटप केल्याचे समजते. मात्र गतवर्षी, शिवसेनेला -२३२ कोटी रुपये, काँग्रेसला – ७० कोटी रुपये, भाजपला – ९० कोटी रुपये, राष्ट्रवादीला २० कोटी रुपये तर समाजवादीला – १८ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास भाजपला गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३० कोटी रुपयांचा कमी निधी मिळाला आहे.

- Advertisement -

याचे कारण असे सांगितले जाते की, गतवर्षी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, शिवसेनेला प्राप्त होणाऱ्या निधींपैकी एकूण ३३ कोटी रुपयांचा निधी स्वतःच्या प्रभागात विविध कामांसाठी वापरला असून त्यांनी अशा प्रकारे एकतर्फी निधीचा जास्त वापर केल्याचा आरोप करीत भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांनी रान उठवले होते. त्यामुळे यशवंत जाधव यांनी, मिश्रा यांच्यावर खूप संताप व्यक्त केला होता. वास्तविक, पालिकेतील निर्वाचित नगरसेवकांना एक कोटी रुपयांचा निधी दिला जातो. त्या व्यतिरिक्त स्थायी समिती अध्यक्ष त्यांच्या अधिकारातील ४२५ कोटी रुपयांच्या निधीकज वाटप करीत असतात.

सर्वपक्षीय गटनेते यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याशी बैठक करून स्थायी समितीसाठी एकूण ९०० कोटी रुपयांची मागणी केली होती ; मात्र त्यांनी ६५० कोटी रुपयांचा निधी दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. जर आयुक्त यांनी अधिकचा २५० कोटी रुपयांचा निधीही दिला असता सर्वपक्षीय नगरसेवकांना अधिक निधी उपलब्ध झाला असता, असे यशवंत जाधव यांचे म्हणणे होते.

- Advertisement -

हेही वाचा –  शाळांच्या फी प्रश्नावर आता मुंबई हायकोर्ट सोमवारी दुपारी निर्णय देणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -