घरमुंबईसंजय राठोड हाच पूजा चव्हाण हिचा हत्यारा- चित्रा वाघ

संजय राठोड हाच पूजा चव्हाण हिचा हत्यारा- चित्रा वाघ

Subscribe

'संजय राठोडांच्या मुसक्या सरकारनं आवळा'

स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले. यानंतर त्यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूला राठोडच जबाबदार असून संजय राठोड हाच पूजा चव्हाण हिचा हत्यारा असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तर समाजाला वेठीस धरून मी निर्दोश आहे, हे सांगण्याचा केविलवाना प्रयत्न संजय राठोड यांनी केला आहे. याला काहीही अर्थ नाही. कारण गुन्हेगाराला कोणतीही जात नसते हे माननारी मी आहे. १५ दिवसांनंतर बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पवित्र पोहरादेवीकडे जाऊन संजय राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन त्यांनी घेतलं. हे म्हणजे स्वतः केलेल्या पापाची कबुली देण्यासाठी संजय राठोड तेथे गेले आहे.

ज्या पद्धतीने स्वतः चूका करायच्या आणि संपूर्ण समाजाला वेठीस धरायचं हा एक नवा ट्रेंड राजकारणात सुरू झालेला आहे. त्या-त्या ठिकाणी त्या-त्या मंत्र्याच्या समाजाला एकत्रित करायचं त्याचे फोटो, व्हिडिओ पाठवा, असे करून समाजाला एकत्रित करायचं, असे सुरू आहे. यावेळी लाखो लोकं जरी त्या ठिकाणी एकत्रित येऊन मोठ-मोठ्या घोषणा केल्या, तरीही पूजा चव्हाण संजय राठोड हा हत्यारा आहे, यावर आम्ही ठाम आहोत, कारण अद्याप सर्वच प्रश्न अनुत्तरीत आहेत, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

- Advertisement -

आपण शेण खायचं आणि समाजाला वेठीस धरायचं

राज्य सरकारचे मंत्री बलात्काऱ्यांना पाठिशी घालतात, हे शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली. पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल केलेला अहवाल ही महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे. बंजारा समाजाबद्दल आदर आहे. आपण शेण खायचं आणि समाजाला वेठीस धरायचं, हे योग्य नाही. संजय राठोड हा पूजा चव्हाणांचा हत्यारा आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

संजय राठोडांच्या मुसक्या सरकारनं आवळा

निर्दोष आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड यांनी केला. संजय राठोड त्यांनी केलेल्या पापाची कबुली करण्यासाठी ते बंजारा समाजाच्या काशीमध्ये गेले. समाजाला एकत्रित करुन घोषणाबाजी केली गेली. दोन फरार मुलांपैकी एका मुलाचा सुगावा लागला. संजय राठोडांचा शहाणपणा गेले पंधरा दिवस कुठे होता. दोन पैकी एक मुलगा फरार आहे. एक मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे. बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळ्या मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरु आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. संजय राठोडांच्या मुसक्या सरकारनं आवळा, असे आव्हानदेखील चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला दिले.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -