घरमुंबईअमृता यांच्यावर होणाऱ्या टीकेवर फडणवीसांचा सरकारला टोला

अमृता यांच्यावर होणाऱ्या टीकेवर फडणवीसांचा सरकारला टोला

Subscribe

अमृता यांच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल फडणवीस म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी महिलांच्या सशक्तीकरणासंदर्भात ‘तिला जगू द्या’ हे गाणं गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. या गाण्याची निर्मिती टी- सिरीजने केली असून हे गाणं काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल तुफान व्हायरल झाले. दरम्यान यावेळी अमृता फडणवीस यांच्यावर प्रचंड टीकेची झोड उठवण्यात आली. नेटकऱ्यांनी त्यांच्या या नव्या गाण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकरांसह राजकीय लोकांचा देखील सहभाग होता. या सर्व मुद्द्यांवर आज अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलं असून फडणवीस सुद्धा त्यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. यावेळी अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे.


अमृता फडणवीसांच्या गाण्यावर महेश टिळेकरांची टीका; “गायी म्हशीचं हंबरणं एकवेळ चालेल पण…”

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून अभिनंदन मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी, ‘जर आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांनाही कुटुंब आहेत’, असे वक्तव्य केले होते. याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाचं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले .

- Advertisement -

“मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर देईन”

‘आम्ही कधीही कुणाच्या घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कधीही टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय बोलता, काय टीका करता, ट्विटरवर काय टाकतात, हे सर्वांनी पाहिले आहे. पण मी कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर हे उत्तरानेच देईल’ असा इशारा फडणवीस यांनी दिला.

तसेच, ‘मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतून कोणतीही महाराष्ट्राला दिशा मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसं काही झाले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात धमकी देणार मुख्यमंत्री मी पाहिला नाही. त्यांची वक्तव्य हे शोभणीय नाही. नुसती धमकी देणारी भाषा ही नाक्यावर होत असते, वर्षपूर्तीनिमित्ताने होत नसते. विरोधकांना चिरडण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली, ते फार काळ टिकले नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -