घरCORONA UPDATE४ रूग्णालयांनी नाकारल्यामुळे महिलेचा मृत्यू, किरीट सोमय्यांनी प्रशासनावर उपस्थित केला प्रश्न!

४ रूग्णालयांनी नाकारल्यामुळे महिलेचा मृत्यू, किरीट सोमय्यांनी प्रशासनावर उपस्थित केला प्रश्न!

Subscribe

मुंबईत ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महिलेला रूग्णालयात दाखल करण्यासाठी तीचा पती रिक्षातून रूग्णालयांमध्ये धावाधाव करत होता. पण केवळ कोरोना रिपोर्ट नसल्यामुळे चार रूग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर सायन रूग्णालयात या महिलेचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर भाजपा नेते किरीट सोमय्यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मृत्यूला जबाबदार कोण? अशी विचारणा केली आहे.

- Advertisement -

किरीट सोमय्यांनी ट्विट करत या महिलेची माहिती दिली आहे. आणि प्रशासनाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार , सुषमा यांचे पती अनिल रविवारी त्यांना रिक्षातून मिठागर, सावरकर आणि डॉ आंबेडकर हॉस्पिटलला गेले होते. पण रुग्णालयांनी करोना रिपोर्ट नसल्याने त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर रात्री ८ वाजता त्यांना सायन रुग्णालयाने दाखल करुन घेतलं. यावेळी डॉक्टरांनी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं घोषित केलं.

किरीट सोमय्या यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. सोबतच सुषमा यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? अशी विचारणा केली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – सरकारने घेतला निर्णय, आता ३१ डिसेंबरपर्यंत करा Work From Home!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -