भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली असून यासंबंधी त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी डॉ. मेधा सोमय्यादेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे की, ‘मी आणि माझी पत्नी मेधा सोमय्या कोरोनाबाधित झालो असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.’ आजच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता किरिट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोना झाल्याचे समजते.
Me & My Wife Prof Dr Medha Somaiya are tested COVID Positive. Both r hospitalized, treatment started
मी आणि माझी पत्नी प्रा. डॉ मेधा सोमैया कोरोना पोझिटीव/बाधित झालो असून हॉस्पीटल मधे उपचार सुरू झाले आहे@BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 10, 2020
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोना संसर्ग झाल्याचे समजतात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मला विश्वास आहे की दोघेही लवकर बरे होतील. परमेश्वराचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठिशी आहेत, असे ट्विट त्यांनी केले आहे.
हेही वाचा –
चाकमान्यानू लक्ष देवा! कोकणात जाणार्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक