घरताज्या घडामोडीPratap Sarnaik: ईडीची मोठी कारवाई, प्रताप सरनाईकांना होणार अटक - किरीट सोमय्या

Pratap Sarnaik: ईडीची मोठी कारवाई, प्रताप सरनाईकांना होणार अटक – किरीट सोमय्या

Subscribe

राज्यात सध्या ईडीच्या कारवायांचे सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवरील कारवाईला दोन दिवस उलटत नाही तोवर ईडीने शिवसेनेच्या आणखीन एका नेत्यावर मोठी कारवाई केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप नाईक यांची ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. माहितीनुसार, यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅटचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. NSEL घोटाळ्याप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईकांवर कारवाई केली आहे. याच अनुषंगाने बोलत असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुढील काही दिवसांत प्रताप सरनाईकांना अटक होईल असे सांगितले आहे.

‘प्रताप सरनाईक यांनी पार्टनरसोबत मिळून २१६ कोटींची केली चोरी’

एका मराठी वृत्तवाहिनी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ‘२०१३मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. पाच हजार सहाशे कोटी रुपयांचा नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडचा घोटाळा झाला होता. त्यानंतर कारवाई सुरू झाली. प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर आस्था बिल्डर पाच हजार सहाशे कोटींपैकी २१६ कोटींची चोरी केली होती. मग त्यातील ३५ कोटी रुपये प्रताप सरनाईक यांच्याकडे आले. त्यानंतर सरनाईक यांनी टिटवाळा येथे ७८ कोटींची जमीन घेतली. ती जमीन पण ईडीने काही दिवसांपूर्वी जप्त केली. आता ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. पुढे प्रताप सरनाईकांना अटक होणार आहे.’

- Advertisement -

पुढे सोमय्या म्हणाले की, ‘ईडीच्या या कारवाईनंतर दुसऱ्यापण उद्योग धंद्यांवर कारवाई होणार आहे. एमएमआरडीचा ५०० कोटींचा जो सिक्युरिटी घोटाळा झालाय, त्याच्यावरही कारवाई होणार आहे. उद्धव ठाकरेंनी जरी पोलिसांना सांगितलं असेल निर्दोष आहे, घोषित करा. पण कोर्ट आणि ईडी त्या घोटाळ्यात पण प्रताप सरनाईकला सोडणार नाही.’


हेही वाचा – प्रताप सरनाईकांना ईडीचा दणका, 11.36 कोटींची संपत्ती जप्त

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -