घरताज्या घडामोडीसुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे गजाआड जातील - नारायण राणे

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे गजाआड जातील – नारायण राणे

Subscribe

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर परखड शब्दांत टीका केली. त्यात नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे या तिघांवर त्यांनी खोचक शब्दांत टिप्पणी केल्यानंतर संतापलेल्या नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या रागाला मोकळी वाट करून दिली. यावेळी बोलताना नारायण राणेंनी दिशा सलियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना गजाआड जावं लागेल, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. ‘सुशांतची आत्महत्या नाही. खुनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात यांचे एक मंत्री असतील, तो यांचा पुत्र असेल. सुशांतला कशानं मारलं, त्यात कोण कोण होते हे सगळं बाहेर येईल. दिशावरचा बलात्कार, तिला वरून कुणी टाकलं हे काही लपणारं नाही. सीबीआयने अजून केस क्लोज केलेली नाही. उद्धव ठाकरेंनी गैरसमज ठेऊ नये’, असं नारायण राणे यावेळी म्हाणाले.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाबद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही. निवडणुकांपूर्वी भाजपसोबत युतीमध्ये मतं मागून शिवसेनेचे आमदार निवडून आले. आणि नंतर बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. आता म्हणतात आम्ही आजही हिंदु आहोत. किमान समान कार्यक्रमावर स्वाक्षरी केली, तेव्हाच त्यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली होती’, अशा शब्दांत नारायण राणेंनी टीका केली आहे. संपूर्ण पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केलेला एकेरी उल्लेख यावेळी राजकीय वर्तुळात खटकणारा विषय ठरला.

- Advertisement -

‘उद्धव ठाकरेंनी आजवर त्यांच्यावर सोपवलेली कोणतीही जबाबदारी पूर्ण केलेली नाही. त्यांना प्रत्येक बाबतीत दुसऱ्याची मदत लागते. तुम्ही पिंजऱ्यातले वाघ आहात की पिंजऱ्याबाहेरचे वाघ आहात, ते तरी सांगा. मी सदनात ३९ वर्ष होतो. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंनी अनेक पदं दिली होती. मग बेडूक कोण आणि वाघ कोण? बाळासाहेब ठाकरे असते, तर यांना मुख्यमंत्रीपद दिलंच नसतं. काण त्यांना माहितीये, उद्धव ठाकरे पुळचट माणूस. म्हणे मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा. पण यांची लायकी नाही त्यांचं नाव घेण्याची. त्यांनी छळलंय बाळासाहेब ठाकरेंना. आमच्यासारख्या लोकांनी, शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली आहे. केसेस आम्ही घेतल्या आहेत, तुम्ही नाही घेतल्या’, असं देखील राणे यावेळी म्हणाले.

‘मुख्यमंत्री बनताना सेक्युलर झाले. बेडुक तर एका दिशेने जातो. गांडुळ तर दोन्ही बाजूंनी जातो. ही गांडुळाची वृत्ती आहे. म्हणे शेण आणि गोमूत्र पितात. ते काय रेशनवर सुरू केलं आहे का? आम्ही जर मातोश्रीची आतली, बाहेरची माहिती दिली, तर महागात पडेल. कुणाला दादागिरीची भाषा करताय. शेळपट कुठले. अधिकारी हसतात या माणसाला. लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री म्हणून घेताना’, अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -