घरताज्या घडामोडीpooja chavan संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंचे टि्वट

pooja chavan संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंचे टि्वट

Subscribe

टीकटॉक स्टार पूजा राठोड आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. यामुळे हे प्रकरण तात्पुरते निवळले असल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी याप्रकऱणावर टि्वट करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

या टि्वटमध्ये पंकजा यांनी निष्पक्षपातीपणाचा डोंगर सरकारला अजून ओलांडायचा असल्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर महिलांबद्दल एवढा दुजाभाव महाराष्ट्राला शोभणारा नाही असेही म्हटले आहे. पंकजा मुंडे यांच्या या टि्वटचा रोख धनंजय मुंडेकडे असल्याच्या चर्चा आहेत.

संजय राठोड प्रकरणावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच एक वक्तव्य केले होते. ‘संजय राठोड प्रकरणी जे उद्धव ठाकरे यांनी केले ते शरद पवार यांनी करायला हवं होतं. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता’. असे पाटील यांनी म्हंटले होते. त्याचाच हवाला देत पंकजा यांनी हे टि्वट केले आहे.

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -