घरमुंबईमुंबै बँकेत सत्तांतर, भाजप नेते प्रवीण दरेकर पुन्हा बँकेचे नवे अध्यक्ष

मुंबै बँकेत सत्तांतर, भाजप नेते प्रवीण दरेकर पुन्हा बँकेचे नवे अध्यक्ष

Subscribe

मुंबै बँकेत सत्तातर झाले आहे. बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची निवड झाली आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर मुंबै बँकेत सत्तांतर झाले आहे. भाजपचे प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली.

सहा महिन्यापूर्वी प्रवीण दरेकर यांना धक्का देत महाविकास आघाडीने बँक ताब्यात घेतली होती. आता सरकार येताच पुन्हा सत्तांतर झाले आहे. प्रविण दरेकर यांची अनेक वर्षांपासून मुंबै जिल्हा बँकेवर सत्ता होती. मात्र, सहा महिन्यापूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: निवडणुकीची सूत्र हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले होते.

- Advertisement -

आठवड्यापूर्वी दिला होता राजीनामा –

मुंबै बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर उध्यक्षपदी प्रवीण दरेकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली.

- Advertisement -

असे आहे संचालकांचे पक्षीय बळाबळ –

मुंबै बँकेत एकूण 21 संचालक आहेत. प्रवीण दरेकर मजूर म्हणून अपात्र ठरल्यानंतर आता संचालकांची संख्या 20 झाली आहे.  त्यामुळे अध्यक्षपदासाठी 11 मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून 10 संचालक आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -