विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी हाती येणार आहे. त्यापूर्वी भाजपला एका धक्का बसला आहे. मुंबईचे सचिन सचिन शिंदे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. सचिन शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मतदानानंतर सचिन शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं उर्चांना उधाण आलं आहे.
सचिन शिंदे यांचा शिवसेना ( ठाकरे गट ) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ येथे प्रवेश झाला आहे. यावेळी दादर-माहीमचे विभागप्रमुख, दादर-माहीमचे उमेदवार महेश सावंत, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा : वाद चिघळला! “शरद कोळींची गाडी फोडल्यास सुशीलकुमार शिंदे अन् प्रणिती यांचं…”, ठाकरेंच्या नेत्याचा थेट इशारा
मात्र, सचिन शिंदे यांच्या प्रवेशामुळे दादर-माहीममध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. कारण, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असं प्रस्ताव समोर ठेवला होता. तेव्हा, दादर-माहीमचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी भाजपचे सगळे पदाधिकारी माझ्या पाठिशी असल्याचं वक्तव्य केलं होतं.
पण, निकालापूर्वीच भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीच्या काळात सरवकरांसमोर राहिले का? हा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच, सचिन शिंदे यांनी निवडणुकीत आपली ताकद सरवणकर यांच्याऐवजी महेश सावंत यांच्या पाठिशी उभी केल्याचं दिसत आहे. सचिन शिंदे यांच्या प्रवेशामुळे निवडणुकीच्या काळात पडद्यामागे बऱ्याच हालचाली झाल्याचं दिसत आहे.
हेही वाचा : प्रणिती शिंदेंबाबत खालच्या पातळीची भाषा, काँग्रेसचा नेता भडकला; म्हणाले, “शरद्या कोळी, तुझी…”