घरमुंबईभाजप पदाधिकार्‍याची पोलिसांना मारहण

भाजप पदाधिकार्‍याची पोलिसांना मारहण

Subscribe

भाजप आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याने भाजप आधीच अडचणीत आला असताना आता एका भाजप पदाधिकार्‍याने पोलिसाला मारहाण करण्याचा प्रताप केला आहे.

भाजप आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याने भाजप आधीच अडचणीत आला असताना आता एका भाजप पदाधिकार्‍याने पोलिसाला मारहाण करण्याचा प्रताप केला आहे.विक्रोळी येथील टैगोरनगर येथे बुधवारी दुपारी भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव अरविंद चौहान आणि त्यांचे सहकारी विक्रांत सिंग, संजय सिंग, विजय सिंग या सर्वांनी चार पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण आणि धक्काबुक्की केली.

या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सांडभोर, सुरेश जाधव, अनिता पवार या पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण झाली. टागोर नगर येथील भानुशाली कंपाऊंड या जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांच्या उपस्थितीत या जागेचे मोजणी सुरू होती. यावेळी त्या ठिकाणी अरविंद चौहान आणि त्याचे साथीदार आले.त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही भाड्याने आले आहात, तुमचा फेसबुक व्हिडीओ बनवतो, अशी धमकी दिली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता चौहानसह त्याच्या साथीदारांनी पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली.

- Advertisement -

१० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीविक्रोळी पोलिसांनी अरविंद चौहान आणि संजय सिंग अटक केली असून त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. त्या दोघांना विक्रोळी न्यायालयात हजर केले असता त्यांना १० सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -