घरमुंबईभाजपचा मिशन 2019 च्या निवडणुकीचा अ‍ॅक्शन प्लान तयार

भाजपचा मिशन 2019 च्या निवडणुकीचा अ‍ॅक्शन प्लान तयार

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थिती होते. लोअर परळच्या यशंवत भवन येथे ही बैठक झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी आश्रम, भारतीय मजदूर संघ, सहकार चळवळ, संस्कार भारती अशा पस्तीस संघटनांचे प्रमुख प्रचारक बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थिती होते. लोअर परळच्या यशंवत भवन येथे ही बैठक झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी आश्रम, भारतीय मजदूर संघ, सहकार चळवळ, संस्कार भारती अशा पस्तीस संघटनांचे प्रमुख प्रचारक बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थितीही लक्षणीय होती.

बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वनवासी आश्रम, भारतीय मजदूर संघ अशा पस्तीस संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थांमार्फत सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचत आहेत का? याची चाचपणी करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून राज्यातील विविध भागातील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अडचणी, समस्यांची कोंडी फोडण्यासाठी सरकारी पातळीवर नेमके कोणते प्रयत्न सुरू आहेत, याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडणी केली.

- Advertisement -

यावेळी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी उपस्थितांना केल्या. मराठा आरक्षणानंतर झालेली कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि त्याच्या सलग्न संघटना सरसावल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांनासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ,चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित राहून प्रचारकांकडून राज्याच्या एकूण परिस्थितीची माहिती घेतली.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -