शरद पवारांच्या भेटीसाठी आशिष शेलार ‘सिल्व्हर ओक’वर, काय आहे भेटीचे कारण?

भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली आहे.

propose a resolution that Sharad Pawar should remain the President Chhagan Bhujbal

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली आहे. शेलारांनी अचानक पवारांची भेट घेण्याचे काय कारण, आणि या बैठकीत काय चर्चा झाली याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र पवार आणि शेलारांमधील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी पवारांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे काँग्रेससह १९ पक्षांनी नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.

शरद पवारांना भेटणार अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बुधवारी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ‘मातोश्री’ येथे भेट घेतली. दिल्लीतील नोकरशहांच्या बदल्यांवरुन दिल्ली सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यात वाद सुरु आहे. दिल्लीतील नोकरशहाचे अधिकार घेण्यासाठी केंद्र अध्यादेश आणणार आहे. याविरोधात आम आदमी पार्टी (AAP) विरोधाकांची एकजूट करत आहे. त्यासाठीच केजरीवाल यांनी ठाकरेंची भेट घेतली आणि अध्यादेशाला राज्यसभेत विरोध करण्याची मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही त्या लोकांना हरवण्यासाठी एकत्र आलो आहोत जे लोकशाहीच्या विरोधात आहे. मला तर वाटतं त्यांना (भाजप) विरोधक म्हटलं पाहिजे जे लोकशाही विरोधी काम करत आहेत. आम्ही सर्व इथे लोकशाही आणि देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत.”

शरद पवार MCA चे माजी अध्यक्ष
आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. एकमेकांचे विरोधक असलेल्या या नेत्यांच्या अचानक भेटीने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. हे दोघे एकमेकांच्या विरोधात असले तरी क्रिकेट किंवा खेळासंबंधीचा मुद्दा आला तर सर्वच विरोधक एकत्र आलेले दिसतात. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आमदार असलेले आशिष शेलार साधारण एक दशकापासून क्रिकेटच्याही राजकारणात आहेत. तर शरद पवार हे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI), इंटरनॅशनल क्रिकेट काऊंन्सिल (ICC) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष राहिले आहेत.