Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई Thackeray memorial: बाळासाहेबांनी पहिले आमंत्रण फडणवीसांना दिले असते - नितेश राणे

Thackeray memorial: बाळासाहेबांनी पहिले आमंत्रण फडणवीसांना दिले असते – नितेश राणे

इतरांना महत्त्व द्यावे असे शिवसेनेला वाटत नसावे - दरेकर

Related Story

- Advertisement -

स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी भूमिपूजन सोहळा मुंबईतील दादर येथील महापौर निवासस्थानी पार पडणार आहे. या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना उपस्थित करण्यात आले आहे. परंतु विरोधीपक्षनेत्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. राज्य सरकारमधील मंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनादेखली कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनीही टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर पहिले आमंत्रण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिले असते असे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

आज बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, त्यांच्यानंतर… फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाला का बोलावले नाही असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. प्रोटोकॉल? आश्चर्य? असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

- Advertisement -

इतरांना महत्त्व द्यावे असे शिवसेनेला वाटत नसावे – दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, शिवसेनेला इतरांना महत्त्व द्यावे असे वाटत नसेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना सर्व पक्षीय नेत्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाला होता. हे बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम आहे. ही वास्तु चिरंतर टीकणारी त्यामुळे अशावेळी बोलावले असते तर त्या कार्यक्रमाची उंची निश्चित राहिली असती कारण बाळासाहेब हे सर्वांचे आवडते होते. परंतु राजकारण एवढे टोकाला पोहचले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीव्यतिरिक्त कोणालाही बोलाविले नसावे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे घरातील व्यक्ती होते. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी या स्मारकासाठी सतत पुढाकार घेतला, सरकारी परवानग्या घेतल्या होत्या त्यांचे मोठे योगदान होते तर त्यांना निमंत्रित करायला हवे होते असे विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.


हेही वाचा: बाळासाहेब ठाकरे स्मारक भुमिपूजन सोहळा: फडणवीस, राज यांना निमंत्रण नाही


 

- Advertisement -