घरताज्या घडामोडीनगरसेवक पदाचे मानधन भाजप आमदाराने केले बंद, आतापर्यंतचे मानधन मुख्यमंत्री निधीत केले...

नगरसेवक पदाचे मानधन भाजप आमदाराने केले बंद, आतापर्यंतचे मानधन मुख्यमंत्री निधीत केले जमा

Subscribe

आमदार असतानाही मुंबई महापालिकेत नगरसेवक पदाचे मानधन घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपचे आमदार पराग शहा यांनी आतापर्यंत घेतलेले संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आहे. नगरसेवक पदाचे पुढील मानधन बंद करण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या चिटणीस खात्याला पत्रही पाठविले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आमदार असलेले नगरसेवक प्रत्येक महिन्याला मानधन घेत असल्याची माहिती समोर आणली होती. गलगली यांच्या माहितीनंतर आमदार पराग शहा यांनी आपले आतापर्यंतचे घेतलेले मानधन मुख्यमंत्री सहायत निधीमध्ये जमा केले आहे. पालिका चिटणीस यांना पत्र पाठवून या महिन्यापासून मानधन तत्काळ बंद करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

- Advertisement -

आमदार झाल्यावर माझे नगरसेवक पदाचे मानधन बंद झाले असेल असेच मला वाटले.मात्र मानधन सुरूच होते आणि मला त्याविषयी माहिती नव्हती, असा खुलासा शहा यांनी केला आहे.


हेही वाचा – आता मोबाईल ॲपद्वारे पिकांची होणार नोंदणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -