घरमुंबईभाजपच्या आमदाराचा राज्य सरकारला घरचा आहेर

भाजपच्या आमदाराचा राज्य सरकारला घरचा आहेर

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संक्लपनेतील सुशोभीकरणाच्या प्रकल्पामध्ये कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदाराकडून करण्यात आला आहे. सरकारमध्ये असलेल्या भाजपच्याच आमदाराने हा आरोप केल्याने विरोधकांना शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधण्यासाठी आयता मुद्दा मिळाल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साहाय्याने राज्यात सत्ता स्थापन करून ते स्वतः मुख्यमंत्री या पदावर विराजमान झाले. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष मुंबई महानगरपालिका काबीज करण्यावर आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. मुंबईकरांची मने जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मुंबईमध्ये सुशोभीकरणाच्या कामे सुरु करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर मुंबईला सुशोभित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर, चौपाट्यांवर, उद्यानांमध्ये सुशोभीकरण करण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेल्या या सुशोभीकरणाच्या कामात कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारकडून करण्यात आलेला आहे. भाजपचे मुंबईतील मुलुंड विधानसभेचे आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडून हा आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे आता राज्य सरकारच्या गोटात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील सुशोभीकरणाच्या प्रकल्पात 263 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप माहीत कोटेचा यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिहीर कोटेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात करण्यात येणाऱ्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पामध्ये लावण्यात येणाऱ्या बाकांसाठी निविदा मागविण्यात आल्या. या निविदा प्रक्रियेत प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने तब्बल 263 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे. तर अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी एकाच व्यक्तीला कंत्राट देण्यात आले आहे, असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

दरम्यान, सत्तेत असलेल्या भाजपच्या आमदारानेच सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठी आयता मुद्दा मिळाल्याचे बोलले जात आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. या महानगरपालिकेवर गेल्या 25-30 वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. पण आता हीच महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईकरांच्या खिशाला कात्री! पोह्यांच्या दरात होणार वाढ

मुंबई महानगरपालिकेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप-शिंदे गट कामाला लागला आहे. यासाठीच शहरातील रस्ते खड्डेमुक्त करतानाच पूल, फूटपाथ, उद्याने, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून पालिकेला सूचना करण्यात आलेल्या आहेत. सत्ताधाऱ्यांच्या या प्रयत्नाला आगामी निवडणुकीत मुंबईकर नागरिक कसा प्रतिसाद देतात? हे पाहणं देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. पण आता भाजपच्याच आमदाराने सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिल्याने हे प्रकरण नेमके काय वळण घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -