घरमुंबईनिधी वाटपावरून भाजपा आमदाराचा राजीनाम्याचा इशारा; फडणवीसांना लिहिले पत्र

निधी वाटपावरून भाजपा आमदाराचा राजीनाम्याचा इशारा; फडणवीसांना लिहिले पत्र

Subscribe

मुंबई : निधी वाटपावरून भाजपामध्ये ठिकणी पडण्याची शक्यता आहे. वर्ध्यातील आर्वीचे भजापाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आमदार फक्त नाराजी व्यक्त करून थांबला नाही तर त्यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराही दिला आहे.

आर्वी विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारकडून निधी देण्यात आला आहे. पण या निधीसाठी वर्ध्यातील आर्वीचे भाजपा आमदार दादाराव केचे (dadarao keche) यांनी राज्य सरकारकडे कोणतेही पत्र पाठवले नव्हते. दुसऱ्यांच्या पत्रावर हा निधी देण्यात आला आहे. आपलं पत्र नसतानाही दुसऱ्याच्या पत्रावर निधी देणे हा आपला घोर अपमान असल्याचे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी असेही म्हटले की, असंच जर होत असेल तर  मला नाईलाजास्तव आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा दादाराव केचे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिला आहे.

- Advertisement -

माझ्याकडे राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही
दादाराव केचे म्हणाले की, आर्वी, आष्टा, कारंजा हे तीन भाग माझ्या मतदारसंघात येतात. माझ्या मतदारसंघातील मतदारांनी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी 2009, 2014 आणि 2019 मध्ये मला विजयी केले. त्यामुळे मी आर्वी, कारंजा, आष्टा नगरपालिका आणि पंचायतीसाठी निधी मागितला होता. आष्टी आणि आर्वीसाठी राज्य सरकारला पत्र लिहून मी 5 कोटीच्या निधीची मागणी केली होती. पण कारंजासाठी मी पत्र लिहून मागणी केलेली नसतानाही 5 कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती केचे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मी आर्वीचा दुसऱ्यांदा आमदार आहे. पण माझ्या पत्राशिवाय 12 एप्रिल 2023 ला निधी देण्यात आला. पत्र नसतानाही निधी दिल्यामुळे माझा घोर अपमान झाला आहे. त्यामुळे माझ्याकडे राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे केचे यांनी सांगितले.

निर्णय रद्द करण्याची मागणी
दादाराव केचे म्हणाले की, मतदारसंघात एकही कार्यकर्ता नसताना संघटना बांधली आहे, त्यामुळे मला तिकीटाची चिंता नाही. या मतदारसंघावर अनेकांचा डोळा असल्यामुळे निधी वाटपाच्या माध्यमातून आघात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे की, दुसऱ्यांच्या पत्रावर दिलेला निधी रद्द करा. आधी आष्टी आणि आर्वीला निधी द्या, मग इतरांना निधी द्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -