घरCORONA UPDATEVideo - भाजप खासदाराच्या मुलांची स्वपक्षातील कार्यकर्त्यांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Video – भाजप खासदाराच्या मुलांची स्वपक्षातील कार्यकर्त्यांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

कोटला कॉलनीच्या समता नगर परिसरात ही घटना घडली आहे.

औरंगाबादमध्ये भाजप खासदार भागवत कराड यांच्या मुलांनी भाजपच्याच कार्यकर्त्यावर घरात घुसून  हल्ला केला आहे. आमच्या वॉर्डात का काम करतोस?  असा सवाल करत भाजप खासदार भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांनी कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या दोघांनी कुणाल मराठे नावाच्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण केली आहे. पोलिसांनी हर्षवर्धन आणि वरुण कराड या दोन मुलांसह सोनवणे नामक व्यक्तीवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप खासदाराच्या मुलाने भाजपच्याच कार्यकर्त्याला केली मारहाण | BJP MP son beat party workers | Aurangabad

भाजप खासदाराच्या मुलाने भाजपच्याच कार्यकर्त्याला केली मारहाण | BJP MP son beat party workers | Aurangabad

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮೇ 23, 2020

- Advertisement -

कोटला कॉलनीच्या समता नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात कोरोनाशी संबंधित एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे या परिसरात कुणाल मराठे या कार्यकर्त्याने सॅनिटायझरची फवारणी केली. वॉर्डात निर्जंतुकीकरण केल्यानं भागवत कराड यांच्या मुलांनी मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते कुणाल मराठेंनी केला आहे. औरंगाबादेतल्या कोटला कॉलनीत रात्री ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. तर कुणाल मराठेच्या तक्रारीनंतर औरंगाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. व्हायरल झालेल्या कराड यांच्या मुलांसह तिघे मराठे यांना मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे.

कुणाल मराठे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, समतानगर भागात कोरोनाचा रूग्ण सापडला. त्यामुळे त्यांनी वॉर्डात निर्जुंतकीककणाचे काम केले. त्यानंतर रात्री आपल्या कुटुंबासोबत घरी जेवत होते. यावेळी घराचा दरवाजा वाजला. दरवाजा उघडल्यानंतर हर्षवर्धन कराड, वरुण कराड आणि पवन सोनवणे हे तिघे मराठे यांच्या घरात घुसले, तू वॉर्डामध्ये फिरायचे नाहीस, कारण येत्या मनपा निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळणार असल्याने मी लोकांना मदत करत असतो, असे म्हणत तिघांनी तू लोकांना कोणतेही मदत कार्य करायचे नाही आणि कुठलेही काम करायचे नाही, असे म्हणत मारहाण करायला सुरूवात केली. या प्रकरणी कुणाल मराठे यांच्या तक्रारीवरून हर्षवर्धन, वरुण कराड आणि पवन सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – चिंता वाढली! २४ तासात ८७ पोलिसांना कोरोनाची लागण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -