यामुळे भाजप सदस्यांना स्थायी समिती बैठकीत नो एन्ट्री

corporator Dr Saeeda Khan demands open bmc paramedical course medical college
पालिका मेडिकल कॉलेजमध्ये पॅरामेडिकल प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आज स्थायी समितीची बैठक प्रत्यक्ष ऐवजी ऑनलाईन घेतली. तसेच, कोरोना संदर्भातील परिपत्रकाचा लखोटा सादर केल्याने बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रत्यक्ष बसण्यासाठी न्यायालयीन आदेशाकडे बोट दाखवत आग्रही असलेल्या भाजप सदस्यांची चांगलीच गोची झाली. गेल्या आठवड्यापर्यंत फक्त स्थायी समिती अध्यक्ष आणि सर्वपक्षीय गटनेते या प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहत असत. मात्र स्थायी समितीची प्रत्यक्ष बैठक या बुधवारपासून समिती अध्यक्ष यांच्या आदेशाने पूर्वीप्रमाणेच पुन्हा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.

स्थायी समितीच्या प्रत्यक्ष बैठकीत गेल्या अनेक दिवसांपासून भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष आग्रही होते. भाजपच्या दोन सदस्यांनी तर त्यासाठी न्यायालयातही याचिका दाखल करून दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना स्थायी समितीच्या गटनेत्यांच्या उपस्थित पालिकेत पार पडणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत बसण्यास परवानगी दिली.

गेल्या बैठकीत त्याच आधारे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपच्या त्या दोन सदस्यांना समिती बैठकीत बसण्यास परवानगी दिली. त्यावेळी पालिका विधी खात्याच्या अधिकाऱ्यांनी भाजपच्या सर्व सदस्यांना नव्हे फक्त याचिकाकर्त्या दोन सदस्यांनाच बैठकीत बसण्यास परवानगी आहे, असा अनुयार्थ लावत स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळेच आपण भाजपच्या इतर सदस्यांना त्यावेळी घेतलेल्या प्रत्यक्ष सभेतून बाहेर काढल्याचे समिती अध्यक्ष यांनी सांगितले होते. त्यावेळी भाजपच्या सदस्यांनी मोठया प्रमाणात गदारोळ घातला होता. मात्र आज स्थायी समितीची बैठक सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी, पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत भाजपच्या सर्व सदस्यांना स्थायी समितीच्या बैठकित बसण्यास परवानगी देण्याची विनंती करीत तसे पत्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना दिले होते.

जर बैठकीत भाजप सदस्यांना न बसू दिल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल आणि आम्ही पुन्हा न्यायालयात दाद मागू, असा इशाराही दिला होता. मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, त्यागोदरच फिल्डिंग लावून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीबाबत राज्य शासनाने दिलेल्या परिपत्रकाचा आधार घेऊन स्थायी समितीच्या सभा प्रत्यक्ष घेण्यात अडचण असल्याचे स्पष्ट करीत आजची बैठक प्रत्यक्ष न घेता ऑनलाईनच घेतली. त्यामुळे भाजपने तीव्र संताप व्यक्त केला असून आता पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव जे ऑनलाईन बैठक घेण्यावर ठाम आहेत.


हेही वाचा – पालिका चिटणीस विभागातील ‘सेवा जेष्ठता धोरण’ मंजूर