घरताज्या घडामोडीमनसेच्या मोर्चात भाजप कार्यकर्तेही होणार सहभागी!

मनसेच्या मोर्चात भाजप कार्यकर्तेही होणार सहभागी!

Subscribe

मनसे पक्षातर्फे येत्या रविवारी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा मोर्चा निघणार आहे. पण त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे आता मनसेच्या या मोर्च्यात भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत. तसे आदेशच भाजप नेत्यांकडून भाजपच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती मिळत असून, भाजपने या मोर्चाला अधिक बळकटी मिळावी यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या सर्व वॉर्ड अध्यक्षांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान, या मोर्चात भाजपच्या नेत्यांनी सहभागी व्हायचे की नाही? हे अजून ठरलेले नसून, भाजपचे मुंबईचे कार्यकर्ते मात्र मनसेच्या मोर्चात सहभागी होणार आहेत.

भाजपचे कार्यकर्ते घेणार हातात तिरंगा!

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मनसेच्या या मोर्चात सहभागी होणारे भाजपचे कार्यकर्ते हे हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी होणार असून, मनसेच्या मोर्चाला पाठिंबा देणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाअधिवेशनात घेतलेली हिंदुत्वाची भूमिका, तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना पळवून लावण्यासाठी काढत असलेला मोर्चा यामुळे मनसे आणि भाजपमध्ये जवळीक वाढली आहे. यामुळेच आता मनसेच्या मोर्चाला भाजप कार्यकर्ते देखील उपस्थित राहून समर्थन देणार आहेत.

- Advertisement -

मनसेचे कार्यकर्ते घालणार भगवी टोपी!

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोर्चासाठी मनसेने खास भगवी टोपी तयार केली असून, ही टोपी मनसेच्या नव्या झेंड्याप्रमाणेच असणार आहे. तसेच या मोर्चासाठी मनसेने मुंबईतील विभाग अध्यक्षांकडे महत्वाची जबाबदारी दिली आहे. दरम्यान, मनसेने आपल्या मोर्चासाठी भायखळा ते आझाद मैदान अशी परवानगी मागितली होती. पण पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत ही परवानगी नाकारली. त्यामुळे आता मनसेचा मोर्चा गिरगाव चौपाटी हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा निघणार आहे.


VIDEO – ही लढाई आहे…मनसेच्या महामोर्चाचा टिझर रिलीज
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -