भाजपाध्यक्ष अमित शाह पुन्हा मुंबई दौऱ्यावर

२६ तारखेला मुंबईत येणार

amit shah
भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा

भाजपाध्यक्ष अमित शाह येत्या २६ तारखेला पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. युतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अमित शाह मुंबई दौऱ्यासाठी दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. रविवारी (२२ सप्टेंबरला) अमित शाह मुंबईत आले होते. पण, त्यावेळी पक्ष संघटनेचे आणि खासगी कार्यक्रमासाठी मुंबई आले होते. त्यामुळे, युतीच्या जागावाटपासंदर्भात कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. २६ सप्टेंबरला अमित शाह यांचा पूर्वनियोजित दौरा आहे.

शिवसेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब होणार

पुढील दोन दिवसांत युतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपाचे अनेक फार्म्युले समोर आले आहेत. पण, यावेळी तरी शिवसेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.


हेही वाचा – ‘भारतीयांच्या आदेशावर काम करणारा मी साधारण व्यक्ती’

भाजपकडून देण्यात आलेल्या जागांच्या ऑफरवर शिवसेना खूश नाही. शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कोण माघार घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, येत्या दोन दिवसात जागा वाटपाचा सुवर्णमध्य साधून नवीन फॉर्म्युला समोर येऊ शकतो.