जे.पी. नड्डा यांच्या मुंबईतील ‘या’ कार्यक्रमात बत्तीगुल

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बुधवारी (१७ मे) मुंबई दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा यांचा मुंबई दौरा हा महत्वाचा मानला जात आहे. त्यानुसार, या दौऱ्यात नियोजित असलेल्या मुंबईतील कांदिवली येथील एका कायक्रमात जे.पी. नड्डा यांनी हजेरी लावली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बुधवारी (१७ मे) मुंबई दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा यांचा मुंबई दौरा हा महत्वाचा मानला जात आहे. त्यानुसार, या दौऱ्यात नियोजित असलेल्या मुंबईतील कांदिवली येथील एका कायक्रमात जे.पी. नड्डा यांनी हजेरी लावली. मात्र या कार्यक्रमादरम्यान बत्तीगुल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Bjp President Jp Nadda Program At Kandivali In Mumbai Suffered A Power Outage)

मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपच्या पन्ना प्रमुखांच्या कार्यक्रम सुरू होता. मात्र या कार्यक्रमात अचानक वीज गेली. मात्र कार्यक्रम सुरू असताना अचान लाइट गेल्याने कार्यकर्त्यांनी मोबाईल टॉर्च लावून कार्यक्रम सुरू ठेवला. यानंतर थोड्याच वेळात लाईट परत आली असं सांगण्यात येत आहे.

दोन दिवसीय मुबंई दौरा

भाजपचे राष्ट्रीच अध्यक्ष दोन दिवसांच्या मुबंई दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीच आज दुपारी जे. पी. नड्डा यांचे मुंबईतील विमानळावर आगमन झाले. त्यानंतर जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या भाजपच्या पन्ना प्रमुख्यांच्या कार्यक्रमादरम्यान लाइट गेल्याचा हा प्रकार घडला.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीनेही भाजप रणनीती आखत आहे. कर्नाटकमधील निवडणुका पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) आता आगामी निवडणूकांची तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून बूथ स्तरावर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.


हेही वाचा – ‘त्या’ SIT रिपोर्टमधील सर्वांवर कारवाईची मागणी; आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट